जिनेव्हा : जगभरातल्या तीन महिलांपैकी एका महिला तिच्या जीवनकाळात किमान एकदा तरी लैंगिक हिंसेला बळी पडली आहे असं संयुक्त राष्ट्राच्या जागतिक आरोग्य संघटना आणि एक भागिदार संस्थेनं आपल्या अहवालात नमूद केलंय. 


जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी या संबंधातील एक अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये महिलांना कोणत्या हिंसेला सामोरं जावं लागतंय याचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये असंही सांगण्यात आलंय की 25 वर्षाच्या आतील जी महिला कोणत्या ना कोणत्या नात्यामध्ये आहे, त्यामधील एक चतुर्थांश महिलांना हिंसेला सामोर जावं लागलंय. 


पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी फाशी घेतोय; व्हिडीओ तयार करत तरुणाची आत्महत्या


या अहवालात 2010 ते 2018 या दरम्यानच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना काळात महिलांना घरघुती हिंसेला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागलंय. या काळातील आकडेवारीचा या अहवालात समावेश करण्यात आला नाही. 


जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं की महिलांच्या विरोधातील होणारी हिंसा ही प्रत्येक देशात आणि प्रत्येक संस्कृतीत पहायला मिळते. त्यामुळे लाखो महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नुकसान झालं आहे. कोरोनाच्या काळात जगभरातील महिलाच्या विरोधातील हिंसेमध्ये वाढ झाली आहे. 


प्रत्येक देशांच्या सरकारांनी महिलांच्या विरोधात होणारे अत्याचार थांबवण्यासाठी कडक कायदे करावे असंही संयुक्त राष्ट्राच्या अध्यक्षांनी आवाहन केलंय. 


महिलांकडे एकटक पाहत राहणं म्हणजे विनयभंगच : कोर्ट