Putin Heart Attack : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले

Vladimir Putin Cardiac Arrest : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. एका टेलिग्राम चॅनेलने हा दावा केला आहे.

Continues below advertisement

Russia President Vladimir Putin Health Update : रशिया (Russia) चे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) यांना ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुतिन यांना कार्डिएक अरेस्ट (Cardiac Arrest) येऊन ते रुममध्ये खाली कोसळले होते, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. WION च्या बातमीनुसार, क्रेमलिन इनसायडर नावाच्या एका टेलिग्राम चॅनेलने याबाबत माहिती दिली आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, एका सुरक्षा कर्मचाऱ्याला पुतिन बेडरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले. 

Continues below advertisement

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक

पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता, असा दावा मीडिया रिपोर्टमधून करण्यात आला आहे. त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. ही घटना 22 ऑक्टोबर रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. पुतिन यांना त्यांच्या निवासस्थानी असलेल्या एका विशेष वैद्यकीय सुविधा असलेल्या आयसीयूमध्ये हलविण्यात आलं, असंही सांगण्यात येत आहे.

बेडरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले

व्लादिमीर पुतिन यांना रविवारी संध्याकाळी त्यांच्या मॉस्को येथील खाजगी अपार्टमेंटमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचं टेलिग्राम चॅनेलच्या हवालाने सांगण्यात येत आहे. क्रेमलिनच्या एका माजी अधिकाऱ्याचं हे टेलिग्राम चॅनेल असून त्यांनी या घटनेची माहिती दिली. या माहितीनुसार, बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या पुतिन यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. ताबडतोब डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आणि नंतर डॉक्टरांनी पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान केलं.

रुममध्येच खाली कोसळले

याआधीही याच टेलिग्राम चॅनेलने पुतिन यांच्या आरोग्याबाबत असेच अपडेट्स दिले होते, ज्यापैकी अनेक चुकीचे सिद्ध झालं आहे. टेलिग्राम चॅनेलने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, रविवारी 22 ऑक्टोबरला संध्याकाळी पुतिन यांना कार्डिएक अरेस्ट आल्याचं सांगितलं आहे. दरम्यान पुतिन यांच्या तब्येतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Israel Hamas War : पंतप्रधानांनी हमासच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारावी, इस्रायलची जनता नेतन्याहू यांच्या विरोधात

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola