China Coronavirus: तब्बल दोन वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाच्या उद्रेकाचं केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनामुळे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. दररोज नोंदवण्यात येणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या कोट्यवधींच्या घरात गेल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीन कोरोनाबाधितांची आकडेवारी लपवत आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) चीनकडे कोरोनाबाबत योग्य डेटा शेअर करण्याचे आवाहन केलं होतं. डब्ल्यूएचओनं सांगितलं होतं की, आम्हाला स्पष्ट माहिती देण्यात यावी जेणेकरून कोरोनाबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करता येतील. पण अद्याप चीनकडून कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. अशातच सध्या सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ चीनमधील सध्याच्या कोरोना स्थितीचे असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
ह्युमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट जेनिफर जेंग यांनी सोशल मीडियावर चीनमधील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ शेअर करताना जेनिफर यांनी लिहिलंय की, "24 डिसेंबर शांघाय सिटी हॉस्पिटल..." व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये हॉस्पिटलच्या मजल्यावर मृतदेहांचा ढीग दिसत आहे. यासोबतच जेनिफर यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो अनसन शहरातील आहे. यामध्ये एका इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये अनेक मृतदेह ठेवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी
पार्किंगमध्येही मृतदेहांचा खच
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होत आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णालय, पार्किंग लॉट्समध्ये मृतदेहांचे खच दिसून येत आहेत. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक किलोमीटरची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे. शांघाय शहरातील स्मशानभूमीत मृतदेहांचा मोठा खच दिसून येत आहे.
लोकांना फॉर्मवर सही करायला लावणं
चीनमधील कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा जगासमोर येऊ नये, यासाठी चीन आता एक नवी युक्ती वापरत आहे. ज्यांच्या नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यांच्याकडून एका फॉर्मवर सह्या घेतल्या जातात. सदर व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नसल्याचं त्या फॉर्ममध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तसेच, बीजिंगच्या फ्युनरल होमला दिलेल्या नोटीसनुसार, कोणताही कर्मचारी मीडिया संस्थेशी बोलणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे. यासोबतच कोणत्याही प्रकारचा डेटा शेअर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीननं 8 जानेवारीपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून सूट जाहीर केली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमाही खुली करण्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :