ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत एक दिलासादायक बातमी आली आहे. युरोपियन युनियन नियामक मंडळाकडून फायझर-बायोएनटेक कंपनीची कोरोना लस मंजूर करण्यात आली आहे.


ब्रिटन, बहारीन, कॅनडा आणि अमेरिकेनेही Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिली आहे. अमेरिकेत कोरोनावर वापरण्यात येणारी ही पहिली लस असेल. याआधी ब्रिटन, बहारीन, कॅनडा या देशांनी Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. ब्रिटनमध्ये तर लसीकरणाला सुरुवात झाली आहे.




फायझर आणि बायोएनटेकची भागिदारी
फायझर या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीनं आपल्या जर्मन भागीदारी कंपनी बायोएनटेक सोबत मिळून ही लस विकसित केली आहे. या वर्षाअखेरपर्यंत 5 कोटी डोस आणि 2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याचे ध्येय या कंपनीचे आहे.


ब्रिटनमध्ये लसीकरणास सुरुवात
या लसीच्या वापराला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिलाच देश ठरला होता. मंगळवार पासून त्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. बहारीन आणि कॅनडातही लवकरच लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.


भारतातही Pfizer-BioNtech या कंपनीने इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची लसही अंतिम टप्प्यात आहे. भारतात एकूण आठ लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु असल्याचं समजतंय.


ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू

ब्रिटनमध्ये निरीक्षणादरम्यान कोरोना व्हायरसचा एक नवा प्रकार समोर आला आहे. सध्याच्या घडीला ब्रिटनमध्ये कोरोनाचा फैलाव नियंत्रणाबाहेर असण्यास कोरोनाचा हा नवा प्रकारच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी लागू केली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीची टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे.

#CORONA कोरोनाचा नवा प्रकार किती घातक? ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब थोरात यांच्याशी बातचीत