People Who Live Hundred Years : सध्या आपलं आयुष्य फार धकाधकीचं झालं आहे. गेल्या काही काळात कोरोना, ह्रदयविकाराचा झटका आणि इतर आजारांमुळे अनेकांच्या जीव गेला आहे. अलिकडच्या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनात ह्रदयविकारामुळे झालेल्या आकस्मिक मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, जगात असेही अनेक देश जिथे लोक 100 वर्ष किंवा त्याहूनही अधिक जगतात. या ठिकाणाला शास्त्रज्ञ ब्लू झोनं (Blue Zone) असं म्हणतात.
कुठे राहतात 100 वर्षे जगणारे लोक
जगात एकच नाही तर अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोक 100 वर्षांहून अधिक जगतात. या ठिकाणांना वैज्ञानिक ब्लू झोन म्हणतात. जगातील असे ब्लू झोन भागात मध्य अमेरिकन देशातील कोस्टा रिकामधील निकोया, इटलीतील सार्डिनिया, ग्रीसमधील इकारिया आणि जपानमधील ओकिनावा, तसेच अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील लोंबा लिंडा येथे आहेत. या सहा 6 ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांचं सरासरी वय 100 वर्षे आहे. या 6 ठिकाणांबद्दल एक पुस्तकही लिहिले गेलं आहे.
शंभर वर्ष जगण्याचं 'हे' आहे कारण
अमेरिकन पत्रकार डॅन ब्युटनरने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, ब्लू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनात अनेक गोष्टी समान आहेत. यातील पहिले म्हणजे आहार. ब्लू झोनमध्ये राहणारे लोक इतर लोकांपेक्षा कमी खातात. यासोबतच ब्लू झोनमध्ये राहणारे सर्व लोक मुख्यतः शाकाहारी आहेत. हे लोक अध्यात्मालाही महत्त्व देतात. डॅन ब्युटनर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, इथल्या सर्व लोकांशी संवाद साधल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे लोक कोणत्या ना कोणत्या आध्यात्मिक समुदायाला मानतात.
आहारात पेयांचा अधिक समावेश करा
या पुस्तकातील माहितीनुसार, त्यांनी ब्लू झोनमधील लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या आहाराबद्दल अधिक माहिती घेतली. या लोकांनी सांगितलं की, हे लोक दिवसातून अनेक वेळा चहा किंवा कॉफी सारख्या गरम पदार्थ पितात. शास्त्रज्ञांच्या मते, गरम द्रवरुप पेयांचं सेवन केल्याने तुमचं अनेक आजारांपासून संरक्षण होतं. यासोबतच हे लोक अतिशय निवडक आहार घेतात. जपानमधील ओकिनावा बेटावरील लोक रताळे आणि खरबूज खातात. या दोन्ही गोष्टींमध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
निसर्गाच्या सहवासात राहतात लोक
जगातील सर्व ब्लू झोनमध्ये आणखी एक गोष्ट सामान्य आहे. ही ठिकाणे नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर आहेत. इटलीतील सार्डिनियाप्रमाणे हा संपूर्ण परिसर डोंगराळ आणि अतिशय सुंदर आहे. तसेच, ग्रीसच्या इकारियाही निसर्गरम्य ठिकाण आहे. इकारियातील लोक नैसर्गिक झऱ्यांमध्ये अंघोळ करतात. त्यात आंघोळ केल्याने निरोगी राहण्यास मदत होते, असा त्यांचा विश्वास आहे.