Viral Videoभारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या देशांमध्ये अनेकवेळा काश्मीरच्या (Kashmir)  मुद्द्यावरुन वाद होत असतात. POK बाबत जागतिक पातळीवर चर्चा होत असते. सध्या एका पाकिस्तानी ब्लॉगरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो ब्लॉगर पाकिस्तान हा देश लीजवर घेण्याची विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांना करताना दिसत आहे. या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 


तारिक भट या ट्विटर अकाऊंटवरुन या पाकिस्तानी ब्लॉगरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे की, 'पाकिस्तानी ब्लॉगर आणि बिझनेस टायकूनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान हा देश लीजवर घेण्याची विनंती केली. भारतीय हद्दीतील काश्मीर हे नशीबवान असल्याची भावना या युट्यूबवरुन व्यक्त केली आहे." या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नरेंद्र मोदी यांना टॅग देखील करण्यात आलं आहे.


काय म्हणतो पाकिस्तानी ब्लॉगर? 


व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की पाकिस्तानी ब्लॉगर म्हणतो, "काश्मीर हे अशा देशात आहे, जो देश लवकरच जगावर राज्य करेल. भारत हा देश अमेरिकेला लीड करत आहे, युकेला लीड करत आहे, तसेच पूर्ण जगाला भारत हा देश लीड करतोय. व्यापार, आयटी क्षेत्र, प्रोडक्टिव्ह गोष्टी या सर्व गोष्टींबद्दल भारत हा देश सध्या विचार करत आहे. पण आपला देश हा बिर्याणीची टेस्ट अजून चविष्ट कशी करावी? कबाबची टेस्ट अजून चविष्ट कशी करावी? अशा गोष्टींचा विचार करण्यात व्यस्त आहे."


पुढे तो म्हणतो, 'मोदीजींनी आम्हाला दत्तक घ्यावं. भारताचा पासपोर्ट पाहा, त्यांची अर्थव्यवस्था पाहा. पण आपले लोक, 'कश्मीर बनेगा पाकिस्तान' असा विचार करत बसला आहे. पाकिस्तानमधील लोक तसेच येथील सरकार हे गरीब आहे. गरीब नेहमी श्रीमंतांसोबत मैत्री का करतात? कारण त्यांना श्रीमंतांकडून मदत घ्यायची असते.' 






 पाकिस्तानी ब्लॉगरचा हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत चार हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स देखील केल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी ड्रोननं भारतीय हद्दीत टाकली शस्त्रास्त्र; पोलिसांकडून जप्त