पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर इम्रान खान यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. दौऱ्यात आज डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांची भेट नियोजित आहे. या भेटीत पाकिस्तानमधील सैन्याला मदत कपात करण्याचा मुद्दा, दहशतवादाविरोधातील लढाई आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षिय चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि अफगान तालिबन यांच्यामधील चर्चा एका निर्णयक टप्प्यावर पोहोचली आहे, त्यावेळी इम्रान खान यांना दौरा होत असल्याने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबध तणावपूर्ण बनले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
इम्रान खान यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे. इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जरल फैज हमीद देखील आहेत.
VIDEO | पाकिस्तान नमलं, हाफिजच्या दोन संघटनांवर बंदी घातली | स्पेशल रिपोर्ट