Pakistan Export Donkey to China : आर्थिक संकटाचा (Pakistan Economic Crisis) सामना करत असलेला पाकिस्तान (Pakistan) आता गाढवांवर (Donkey) ओझं लादणार आहे. आता गाढवंच पाकिस्तानची अर्थव्यवस्था सांभाळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कंगाल पाकिस्तानवर आता गाढवं विकण्याची वेळ आली आहे. चीन (China) पाकिस्तानकडून ही गाढवं खरेदी करेल. पाकिस्तानच्या गाढवांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान आहे. हा विनोद नसून खरी परिस्थिती आहे. पाकिस्तान चीनला गाढवे विकतो. चीनमध्ये गाढवांची प्रचंड मागणी आहे. त्याशिवाय पाकिस्तानच्या गाढवांमध्ये चीननं कायमच स्वारस्य दाखवलं आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आता पाकिस्तान चीनला गाढवं आयात करणार आहे.


पाकिस्तानला गाढवं विकण्याची वेळ


चीनमध्ये गाढवाच्या कातडीला खूप मागणी आहे, त्यामुळे गाढवाची मागणी जास्त आहे.  चीनमध्ये गाढवांची संख्या कमी असल्याने चीनला पाकिस्तान, आफ्रिकेसारख्या इतर भागातून गाढवं आयात करावी लागतात. सध्या पाकिस्तान कंगाल झाला असून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. अशात चीनची मागणी पाकिस्तानसाठी आधार ठरु शकते. यामुळे पाकिस्तानने चीनला गाढवं आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. 


चीनमध्ये गाढवांची मागणी वाढती


पाकिस्तान सरकारनं गाढवाचं कातडे तसेच इतर काही वस्तू चीनला निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. पाकिस्तानच्या ARY न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाढवाची कातडी चीनला प्रक्रियेसाठी पाठवली जाणार आहे. चीनमध्ये गाढवाच्या कातडीला खूप मागणी आहे. त्यामुळे तेथे गाढवांना नेहमीच मागणी असते. चीनमध्ये गाढवांच्या कातडीपासून विविध वस्तू तयार केल्या जातात.


चीनमध्ये गाढवांना मोठी मागणी का आहे?


अशक्तपणा, प्रजनन समस्या आणि निद्रानाश यांच्या उपचारांसह अनेक कथित औषधी फायद्यांसाठी चीनमध्ये गाढवाच्या त्वचेचा वापर केला जातो. चीनमध्ये गाढवाच्या त्वचेपासून सौंदर्य उत्पादनेही तयार केली जातात. पूर्वी ही औषधे फक्त चीनचे राजेशाही लोक वापरत होते. पण आता चीनच्या मध्यमवर्गीयांमध्ये त्याची मागणी खूप वाढली आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तान चीनला गाढवांची निर्यात करत आहे. जिवंत गाढवांशिवाय पाकिस्तान चीनला गाढवाची कातडीही पाठवतो.


पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या जास्त


पाकिस्तान देशात गाढवांची संख्या फार जास्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानमधील गाढवांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. पाकिस्तान इकॉनॉमिक सर्व्हे (PES) 2022-23 नुसार, देशात गाढवांची लोकसंख्या वाढली आहे. अनेक अहवालांनुसार, चीनकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या गाढवांचा वापर करुन आता सरकार आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे.