Pakistan: पाकिस्तानमध्ये मुस्लीम देशांच्या संघटनेची (Organisation of Islamic Cooperation) परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत मुस्लीम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी देखील उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, "पाकिस्तान 22 आणि 23 मार्च रोजी ओआयसीच्या परराष्ट्र मंत्री परिषदेचे (CFM) 48 वे सत्र आयोजित करणार आहे. या परिषदेत चीनचे परराष्ट्र मंत्री आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना राज्य सल्लागार वांग यी हे विशेष अतिथी असतील."    


भारताने (India) व्यक्त केली नाराजी 


या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानने भारतातील ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सच्या (All India Hurriyat Conference) अध्यक्षांना आमंत्रित केलं आहे. यावरूनच भारताने नाराजी व्यक्त करत ओआयसीला फटकारले होते. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, ''ओआयसी महासचिवांनी दिलेल्या निमंत्रणाबाबत आम्ही भारतातील मीडिया रिपोर्ट्स पाहिल्या आहेत. मला वाटते की ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्स इस्लामाबाद येथे होणाऱ्या ओआयसी परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या आगामी 48 व्या अधिवेशनात 22 मार्च रोजी सहभागी होणार आहे.''


ते म्हणाले,'' भारत सरकार अशा कृतींना अत्यंत गांभीर्याने घेते. ज्याचा थेट उद्देश भारताच्या एक निष्ठतेला धोका पोहोचवणे, आमच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणे आहे. ओआयसी दहशतवाद आणि भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनेला प्रोत्साहन देणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे.''


महत्त्वाच्या इतर बातम्या :