Ajmal Kasab: इम्रान सरकारचा मित्रपक्ष असलेला एमक्यूएम विरोधी पक्षाच्या पाल्यात गेल्याने इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी एक मोठा दावा केला आहे. ते म्हणाले आहे की, मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबच्या घराचा पत्ता नवाझ शरीफ यांनीच भारताला दिला होता.


या दाव्याने पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. या दाव्याने पंतप्रधान इम्रान खान यांनाही धक्का बसला आहे. त्यांनी एमक्यूएमचे खालिद मकबूल सिद्दीकी आणि बीएपीचे खालिद मगसी यांना या संबधित पत्र दाखविण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र त्यांनी हे आमंत्रण नाकारले. एमक्यूएम आणि बीएपी आता पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात असून त्यांनी विरोधी पक्षाशी जवळीक साधली आहे.


एमक्यूएमचे सदस्य आणि कायदा मंत्री फारुग नसीम आणि आयटी मंत्री अमीन-उल-हक जे पाकिस्तानच्या इम्रान सरकारमधून बाहेर पडणार आहेत, त्यांनीही आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. दुपारी साडेचार वाजता एमक्यूएम नेते खालिद मकबूल सिद्दीकी यांच्यासोबत विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषदही होणार आहे.4


दरम्यान, इम्रान सरकारविरोधात विरोधी पक्षाने असविश्वास प्रस्ताव मांडला आहे. 8 मार्च रोजी विरोधकांनी नॅशनल असेंब्ली सचिवालयाला अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. ज्यावर मतदान होणार आहे. पाकिस्तानच्या 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये खान यांच्या पक्षाचे 155 सदस्य आहेत आणि त्यांना सत्तेत राहण्यासाठी किमान 172 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.  


महत्वाच्या बातम्या