Pakistan Election : पाकिस्तानमध्ये (Pakistan) गुरुवारी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या, मतमोजणीही सुरू झाली. या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी (Pakistan Election Result) सकाळपर्यंत उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती परंतु अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. यामुळे पाकिस्तानातील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. इथल्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक चकमकीही पाहायला मिळाल्या. काही लोकांनी मतदान साहित्य हिसकावून त्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उमेदवार तसेच मतदारांकडून करण्यात आला. लोकांच्या या समस्यांची दखल घेत पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (Pakistan Election Commission) या मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश दिले आहेत.



ईव्हीएमचा वापर झाला असता तर..., पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणाले...


पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी म्हणाले, या निवडणूकीत ईव्हीएमचा वापर झाला असता तर निकाल जाहीर होण्यास उशीर झाला नसता आणि अशाप्रकारचे संकटही आले नसते, ते म्हणाले की पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने निवडणुकीत ईव्हीएमच्या अंमलबजावणीचे जोरदार समर्थन केले होते, परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. ईव्हीएममध्ये दाबलेले प्रत्येक मत केवळ एका बटणाचा वापर करून मोजले जाऊ शकत होते, त्याच्या वापरामुळे, प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते मतदान संपल्यानंतर पाच मिनिटांत दिसून आली असती. ते म्हणाले की, ईव्हीएम लागू करण्याच्या दिशेने 50 बैठका झाल्या, त्या सर्व व्यर्थ गेल्या.


 


या मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार, निवडणुक आयोगाची माहिती


NA-88 खुशाब-II पंजाब


या ठिकाणी मतदान होत असताना इथला जमाव चांगलाच संतप्त झाला. या जमावाने मतदान साहित्य जाळल्याचीही बातमी समोर आली. मात्र आता हे प्रकरण शांत झाल्याने 26 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात येणार असल्याचे निर्देश निवडणुक आयोगाने दिले आहेत.


PS-18 घोटकी-I सिंध


तर या ठिकाणी मतदानादरम्यान काही जणांनी मतदानाचे साहित्य हिसकावून घेतल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.


PK-90 कोहाट-I – खैबर पख्तूनख्वा


ECP ने वरील मतदारसंघातील 25 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत.  या ठिकाणी मतदान होत असताना काही दहशतवाद्यातर्फे मतदान साहित्याचे अतोनात नुकसान केले, या सर्व प्रकरणांमध्ये, सर्वोच्च निवडणूक आयोगाने प्रादेशिक निवडणूक आयुक्तांना NA-242 कराची केमारी-1 (सिंध) मधील 1 मतदान केंद्रावर तोडफोड झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर 3 दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


 


हेही वाचा>>>


Pakistan Election : पाकिस्तान निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट व्हायला सुरूवात, इम्रान खान यांचा विजयाचा दावा, व्हिडीओ केला जारी