Pakistan Economy : पाकिस्तानची अवस्था सध्या खूप दैनिय झालीय. आर्थिक संकटामुळे हैराण झालेल्या पाकिस्तानसोमर आता आणखी एक मोठं संकट उभं राहिलंय. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान (पीओके) च्या नागरिकांनी शोषणाला कंटाळून लडाखमध्ये सामील करून घेण्याची मागणी केलीय. यासाठी गेल्या 12 दिवसांपासून बाल्टिस्तानच्या नागरिकांनी यासाठी आंदोलन केले आहे. या आंदोलाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये दिसून येत आहे की गिलगिट बाल्टिस्तानच्या लोक पाकिस्तानच्या शोषणाला कंटाळून भारतात सामिल करून घेण्याची मागणी करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या सकंटात आहे. कारण पाकिस्तानात ऐतिहासिक महागाई झाली आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशातील सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तेथील तरूणांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. हे सर्व सुरू असतानाच आता गिलगिट बाल्टिस्तानच्या नागरिकांनी भारतात सामिल होण्याची मागणी लावून धरली आहे.
गिलगिट बाल्टिस्तानमध्ये गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. लाखो लोक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. हाता झेंडे आणि भारतात जाण्याच्या मागणीसाठी लोक आंदोलन करत आहेत. कारगिल रस्ता पुन्हा खुला करावा आणि भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमधील कारगिल जिल्ह्यात बाल्टिस्तानला पुन्हा एकदा सहभागी करून घ्यावे अशी मागणी हे आंदोलनकर्ते करत आहेत.
पाकिस्तान सरकारच्या विरोधात गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांनी देशातील गहू आणि इतर खाद्यपदार्थांवर अनुदान देण्याच्या मागणीसह, लोडशेडिंग, बेकायदेशीर जमिनीवर कब्जा करणे आणि या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारखे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. अनेकदा पाकिस्तानकडून गिलगिट बाल्टिस्तानच्या जमिनी आणि संसाधनांवर जबरदस्तीने कब्जा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येथील लोकांनी आंदोलन केले आहे.
पाकिस्तानी लष्कर आणि सरकारविरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. येथील जमिनीचा प्रश्न अनेक दशकांपासून आहे. परंतु 2015 पासून स्थानिक लोक असा युक्तिवाद करत आहेत की, ही जमीन गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांची आहे. कारण हा भाग पीओके अंतर्गत येतो. मात्र, ही जमीन पाकिस्तानी राज्यातील कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करण्यात आली नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
पाकिस्तान महासंकटात, महागाईनं उच्चांक गाठला, गव्हाच्या पीठासाठी भांडणं, व्हिडीओ व्हायरल