Pakistan Economy: आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान देश निर्मितीनंतर सर्वात मोठ्या सकंटात आहे. कारण पाकिस्तानात ऐतिहासिक महागाई झाली आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. महागाईनं उच्चांक गाठला आहे. देशातील सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, नोकऱ्या नाहीत... त्यामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेय. पाकिस्तान यावर कशी मात करणार, याकडे जगाचं लक्ष लागलेय. 


बरोबर चार महिन्यांपूर्वी जवळपास 70 टक्के पाकिस्तान पाण्याखाली गेला होता. अनेक गावं अक्षरश वाहून गेली होती. हजारो एकरवरची शेतीही पाण्यात गेली होती. कोट्यवधी जनतेची घरं जमीनदोस्त झाली होती. इतिहासातलं सर्वात मोठं स्थलांतरही झालं होतं. आणि त्याच महापुराच्या संकटातून बाहेर येण्याआधीच पाकिस्तान आणखी एका महासंकटात अडकलं आहे. 2022 वर्षातील त्याच महापुराचा देशातल्या अन्न उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. आणि त्यामुळेच आज पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक अन्न तुटवडा निर्माण झाला आहे. गव्हाचा सगळ्यात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गव्हाच्या पीठाची किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. 55 ते 60 रुपये प्रतिकिलो असलेलं पीठ आता 150 ते 160 रुपये प्रति किलोवर गेलं आहे. 
 
गव्हाच्या पिठाच्या पाकिटावर अनेक ठिकाणी भांडणं सुरु झालेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्या पाकिटावरुन भांडण सुरु झालं, त्यात गव्हाचं पीठ आहे.. सिंध प्रांतात एका सरकारी दुकानाबाहेरचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. इथंच झालेल्या गोंधाळात एकाचा मृत्यू झाल्याचाही दावा केला गेला जातोय. पाकिस्तानवर फक्त गव्हांचंच संकट नाही..तर इतर खाद्यपदार्थांचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पालेभाज्यांचेही दर वारेमाप वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, 23 कोटींची लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानात एक कोटी जनतेवर उपसामारीची वेळ आली आहे. भविष्यात हाच आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, उपासमारीचा आकडा दोन ते तीन कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारनं जगभरातील अनेक देशांकडे मदतीची मागणी केलीय. त्यावर अमेरिकेनं 200 मिलियन यूएस डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली आहे..पाकिस्तानातील गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियातही व्हीडिओ व्हायरल होतायेत.. ज्यात पाकिस्तानातील महागाई दाखवली जातीय..अमेरिकेनं मदत केलीय ..पण, त्यामुळे स्थिती पूर्णपणे बदलण्याची शक्यता कमीच आहे.. आर्थिक आघाड्यांवर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय. सरकारनं वेळीच पाऊलं उचलली नाही..तर देशात गृहयुद्ध पेटू शकतं..