Imran Khan Released : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात एकच खळबळ माजली होती. इम्रान खान यांना 9 मे रोजी दुपारी अचानक इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक (Arrest) करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना त्रास देण्यात आला अशा चर्चा देखील होत आहेत. इम्रान यांच्या अटकेनंतर देशांत होणाऱ्या हिंसाचाराला आणि हिंसक घटनांना थांबण्यासाठी पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने गुरुवारी 11 मे रोजी इम्रान खान यांच्या सुटकेचे निर्देश दिले. त्यानंतर शुक्रवारी 12 मे रोजी त्यांची सुटका करण्यात आली आहे.
सध्या सोशल मिडियावर इम्रान खान यांच्या सुटकेनंतरचे फोटो समोर आले आहेत. इम्रान खान यांच्यात बराच बदल झाल्याचं या फोटोवरुन स्पष्ट होत आहे. तसेच या फोटोमध्ये त्यांच्यासमोरील टेबलवर त्यांच्यासाठी बऱ्याच वस्तू ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.
'त्यांच्यासाठी संपूर्ण देश रस्त्यावर उतरला'
इम्रान खान यांच्या या अंदाजवार सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काही लोकांच म्हणणं आहे की, 'ही इम्रान खान यांची ताकद आहे, शेवटी त्यांची सुटका करावीच लागली.' तर एका पीटीआय अधिकाऱ्याने म्हटले आहे की, 'इम्रान खान आमचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत, देशाला त्यांची क्षमता माहित आहे, त्यामुळे संपूर्ण देशातील लोकांनी रस्त्यावर उतरुन शाहाबाज यांच्या हुकुमशाहीचा विरोध केला आहे, त्याचा हा परिणाम आहे.' इम्रान खान यांना अटक करण्याचा याआधीही प्रयत्न झाला होता. पण इम्नान खान यांच्या समर्थकांनी त्याला प्रचंड विरोध केला. इम्रान खान यांच्या अटकेनंतर मोठा गोंधळ झाला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काही भागांमध्ये इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सध्या पाकिस्तामध्ये शांततेचे वातावरण आहे
इस्लामबादमध्ये जनतेशी साधणार संवाद
तसेच पीटीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सांगण्यात आले की, आज 12 मे रोजी इम्रान त्यांच्या सुनावणीनंतर इस्लामाबाद येथील जनतेशी संवाद साधणार आहेत.
पाकिस्तानात आनंदाचे वातावरण
या आधी इम्रान खान यांच्या सुटकेच्या निर्देशांनंतर गुरुवारी संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नीने देखील ट्विटरवर आनंद व्यक्त केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची सुटका, आज इस्लामाबाद हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश