नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान हे दोघेही एकमेकांचे शेजारी राष्ट्र आहेत. या दोन्ही देशांच्या सीमा एकमेकांना लागून असली तरीही त्यांच्यातील संबंध फारसे चांगले नाहीत. जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये टोकाचे मतभेद आहेत. याच जम्मू आणि काश्मीर भूभागामुळे या दोन्ही देशांत अनेकवेळा युद्ध झालं. 1999 सालच्या कारगील युद्धात तर मोठा नरसंहार झाला. कारगीलच्या युद्धात पाकिस्तानला भारतापुढे शरण यावं लागलं. पाकिस्तानने याआधी कधीही कारगीलच्या युद्धात (Kargil War) आपला थेट सहभाग मान्य केलेला नाही. मात्र आता पहिल्यांदाच पाकिस्तानच्या लष्कराने आमचा कारगीलच्या युद्धात थेट सहभाग होता, असे कबुल केले आहे. पाकिस्तानच्या या कबुलीचे जागतिक पटलावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. 


पाकिस्ताने थेट मान्य केलं


कारगीलच्या युद्धात कुटनीती वापरून पाकिस्तानने भारताचा भूभाग बळगावण्याचा प्रयत्न केला होता. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानी फौजांना सडेतोड उत्तर दिलं होत. भारताने पाकिस्तानला या युद्धात पराभूत केलं होतं. या युद्धात पाकिस्तानचे हजारो सैनिक मारले गेले होते. याच युद्धात पाकिस्तान लष्कराचा सहभाग होता, असं पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर म्हणले आहेत. पाकिस्तानच्या अनेक सैनिकांनी 1965, 1971, 1999 सालच्या युद्धात बलिदान दिले, असे असीम मुनीर म्हणाले. मुनीर यांचं हे वक्तव्य म्हणजे पाकिस्तानचा कारगील युद्धात थेट सहभाग असल्याची कबुलीच आहे, असे म्हटले जात आहे.


असीम मुनीर काय म्हणाले?  


पाकिस्तानच्या संरक्षण दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात जनरल असीम मुनीर बोलत होते. आपल्या भाषणात ते पाकिस्तानी सैन्याचे गुणगाण करत होते. यावेळी बोलताना "1948, 1965, 1972 सालचे युद्ध असो की 1999 सालचे कारगील युद्ध असो. पाकिस्तान तसेच इस्लामसाठी हजारो सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहे," असे असीम मुनीर म्हणाले. 






कारगील युद्धात काय झाले होते?


याआधी पाकिस्तानी लष्कराने कधीही कारगील युद्धातील थेट सहभाग सार्वजनिक मंचावर मान्य केलेला नाही. कारगील युद्धात मुजाहीद्दीन किंवा काश्मीरमधील फुटीरवादी यांचा सहभाग होता, असे पाकिस्तानी लष्कर अधिकृतपणे सांगते. कारगीलच्या युद्धात पाकिस्तान लष्कराने एलओसीवर दाखरल होत टायगर हील तसेच एलओसीजवळचा भारताच्या काही भूभागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानची ही कुरापत भारताला माहीत होताच भारतीय लष्करानेदेखील पाकिस्तानच्या फौजांना चोख प्रत्युत्तर दिले होते. लडाखमध्ये साधारण तीन महिने हे युद्ध चालले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसघोरांना परत पाठवले होते. या युद्धादरम्यान, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन यांनीदेखील पाकिस्तानला लष्कर मागे घेण्याचे आवाहन केले होते. 


545 भारतीय जवानांचे बलिदान


या युद्धात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. भारतीय लष्कराच्या याच कामगिरीचे कौतुक आणि या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना म्हणून संपूर्ण देशभरात 26 जुलै हा कारगील विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात 545 भारतीय जवानांनी बलिदान दिले होते. पाकिस्तानने मात्र या युद्धात त्यांचे जवान मारले गेले नसल्याचा दावा केलेला आहे. 


हेही वाचा :


PM Modi Invitation: लवकरच पंतप्रधान मोदी पाकिस्तान दौऱ्यावर? शाहबाज शरीफ यांचं 8 वर्षांनी निमंत्रण, पण का?