Omicron Variant : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी मंगळवारी सांगितले की, 10 आठवड्यांपूर्वी कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार समोर आल्यानंतर संसर्गाची 90 दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही प्रकरणे 2020 वर्षामध्ये नोंदवलेल्या एकूण रुग्णांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीची सुरुवात 2020 मध्ये झाली. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सावधगिरीचा इशारा देत म्हटले आहे की जरी ओमायक्रॉन हा विषाणूच्या इतर प्रकारांसारखा प्राणघातक नसला तरी तो टाळणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, जगातील बहुतेक भागांतून मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याच्या अत्यंत चिंताजनक बातम्या येत आहेत.


ओमायक्रॉन इतक्या वेगाने का पसरत आहे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार मारिया वॅन (Maria Van) यांनी ओमायक्रॉनच्या वेगाने पसरण्याचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, याचे पहिले आणि मुख्य कारण म्हणजे ओमायक्रॉनमधील म्यूटेशन होय. म्यूटेशन मानवी शरीराच्या पेशींशी सहजपणे कनेक्ट होण्यास मदत करते. मारिया यांनी आणखी एक कारण सांगितले की, हा विषाणू रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्यात यशस्वी होत आहे. हेच कारण आहे की ज्या लोकांना याआधी संसर्ग झाला आहे, त्यांनाही ओमायक्रॉनची लागण होत आहे. तसेच, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग होत आहे.


तिसरे कारण म्हणजे ओमायक्रॉन वरच्या श्वसनमार्गावर परिणाम करत आहे. हा विषाणू वरच्या श्वसनसंस्थेचा ताबा घेऊन स्वतःसारखे इतर विषाणू बनवत आहे. हेही या विषाणूच्या प्रसाराचे एक प्रमुख कारण आहे. कोरोनाचे इतर विषाणू खालच्या श्वसनमार्गामध्ये किंवा फुफ्फुसात तयार होतात.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha