Brazil Sao Paulo : ब्राझीलच्या (Brazil) साओ पाउलो (Sao Paulo) शहरात बांधकाम सुरू असलेल्या साइट जवळील प्रमुख एक्सप्रेसवेचा काही भाग मेट्रो टनलवर मंगळवारी (1 जानेवारी) कोसळला. तेथे  नवीन भुयारी मार्गासाठी बोगदा खोदण्याचे काम सुरू होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


या दुर्घटनेच्या फोटोमध्ये असे दिसत की, एक्स्प्रेसवेचा काही भाग मेट्रो टनलमध्ये कोसळला. साओ पाउलो राज्याच्या मेट्रो ऑपरेटरने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, नवीन भुयारी मार्ग प्रकल्पासाठी खोदलेल्या बोगद्यांमध्ये पूर आला होते. सार्वजनिक सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले की सर्व 50 कामगार बोगद्यातून बाहेर पडू शकले.


साओ पाउलोचे गव्हर्नर जोआओ डोरिया यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, सांडपाणी कलेक्टरला धक्का बसला, त्यामुळे ही घटना घडली. हा कलेक्टर वॉटर युटिलिटी कंपनी साबेस्प कंपनीचा होता, असं ही त्यांनी सांगितलं. ब्राझीलमधील ऍकिओनाचे संचालक आंद्रे डी अँजेलो यांनी त्याच पत्रकार परिषदेत सांगितले की, उत्खनन आणि सांडपाणी नेटवर्कमध्ये कोणतीही टक्कर झालेली नव्हती.






राज्य वकिलांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी या घटनेचा  तपास सुरू केला आहे, ज्यामध्ये ते कोसळण्याचे नेमके कारण आणि नुकसान किती आहे हे ठरवण्याचा प्रयत्न करतील. Acciona ने निवेदनात म्हटले आहे की या घटनेनंतर सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. 


लाइन 6 चे बांधकाम 2012 मध्ये पूर्ण  होणार होते, परंतु ब्राझीलमधी मंदीच्या दरम्यान निधी कमी झाल्यामुळे अनेक वेळा विलंब झाला. ते आता 2025 मध्ये पूर्ण होणार आहे.


इतर बातम्या :


कोरोनासह इतर 21 आजारांवर लस उपलब्ध, सर्वांना लस घेण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन


मुलांना जन्म द्या अन् अकरा लाखांच्या बोनससह एका वर्षाची सुट्टी मिळवा! 'या' कंपनीचा मोठा निर्णय


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha