Stand-Off Anti-Tank Missile : भारतीय हवाई दलाची (Indian Air Force) ताकद आणखी बळकट झाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय हवाई दल (IAF) यांची रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. 11 डिसेंबर 2021 रोजी पोखरण येथील स्वदेशी बनावटीच्या आणि विकसित केलेल्या हेलिकॉप्टरद्वारे स्टँड-ऑफ अँटी टँक (SANT) या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. क्षेपणास्त्र मुक्त करण्याची यंत्रणा (Release Mechanism), प्रगत मार्गदर्शन (Advanced Guidance) आणि ट्रॅकिंग अल्गोरिदम (Tracking Algorithms), एकात्मिक सॉफ्टवेअर (Integrated Software) सह सर्व यंत्रणांनी चोख कामगिरी बजावली. ट्रॅकिंग प्रणालीने संपूर्ण उपक्रमाचे निरीक्षण केले. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक एमएमडब्ल्यू (MMW Technology) सीकरने सुसज्ज असून यामध्ये सुरक्षित अंतरावरून उच्च दर्जाची अचूक मारक क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र 10 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यातील लक्ष्य भेदून निष्प्रभ करू शकते.
स्टॅन्ड ऑफ अँटी-टँक (SANT) हे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारत (RCI) आणि डीआरडीओच्या समन्वयाने तसेच उद्योगांच्या सहभागातून विकसित करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाचा ताफा बळकट करण्यासाठी लांब पल्ल्याचा बॉम्ब आणि स्मार्ट अँटी एअरफील्ड क्षेपणास्त्रांची चाचणी सुरु आहे. अलीकडच्या काळात चाचणी करण्यात आलेल्या स्वदेशी स्टँड-ऑफ शस्त्रास्त्रांच्या मालिकेतील हे तिसरे क्षेपणास्त्र आहे. प्रगत तंत्रज्ञानासह विविध वैशिष्टयांनी युक्त हे स्वदेशी क्षेपणास्त्र संरक्षणातील आत्मनिर्भरतेकडे एक ठोस पाऊल आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या मोहिमेशी संबंधित पथकाचे अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी म्हणाले की, ''स्टॅन्ड ऑफ अँटी-टँक-SANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीमुळे स्वदेशी संरक्षण क्षमतांना अधिक बळ मिळेल.''
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- PM Modi : पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा
- Mumbai Local : सेंट्रल आणि हार्बर लाईनवर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसं आहे वेळापत्रक
- आंदोलनातील शेतकरी घरी परतले, आमच्या जेवणाचं काय? शेकडोंच्या समोर पुन्हा पोटाचा प्रश्न!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha