वर्स्वा (पोलंड) :  आपल्या चिमुकल्याच्या जीवापेक्षा जगातलं कुठलंही सुख आई-बापांसाठी मोठं नसतं. त्याचीच प्रचिती पोलंडमध्ये आली.

 

रिओ ऑलिम्पिकमध्ये थाळी फेक करुन सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या पोलंडच्या पीटर मालचोवस्कीवर अशीच काहीशी वेळ आली आहे.

 

आपल्या 3वर्षांच्या चिमुरड्याच्या कॅन्सर उपचारासाठी ऑलिम्पिकचं सिल्वर मेडल विकण्याची नामुष्की मालचोवस्कीवर आली आहे.

 

मालचोवस्की 3 वर्षांच्या चिमुकल्याला डोळ्याचा कॅन्सर आहे. त्यावर गेल्या 2 वर्षांपासून  उपचार सुरु आहेत. या उपचारासाठी मालचोवस्कीला त्याचं पदक विकावं लागलं.

 

फेसबुकवर मालचोवस्कीनं यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. तुम्ही जर मला मदत केली तर रौप्य पदक सुवर्ण पदकापेक्षाही मौल्यवान होईल, अशी काळजाला हात घालणारी पोस्ट त्यानं अपलोड केली आहे.