सिंगापूरमध्ये जगातल्या पहिल्या विनाचालक टॅक्सी सेवेची सुरुवात झाली आहे. काही ठराविक ग्राहकांना न्यूटोनॉमी या अॅपच्या माध्यमातून या सेवेचा मोफत लाभ घेता येणार आहे.


 

आतापर्यंत गुगल आणि व्होल्व्हो कंपनीने विनाचालक टॅक्सी सेवा देण्यासाठी चाचण्या घेतल्या होत्या. मात्र आपण ही सेवा पहिल्यांदा ग्राहकांच्या सेवेत देत आहोत असा दावा न्यूटोनॉमी कंपनीने केला आहे.

 

सध्या सिंगापूरमध्ये सहा छोट्या कारच्या माध्यमातून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. वर्षाअखेरीस अशा आणखी 6 कार या कंपनीच्या सेवेत दाखल होणार आहेत.

 

तसेच या कारमध्ये समोरच्या अडथळे टाळण्यासाठी दोन कॅमेरे आणि अत्याधुनिक यंत्रणाही बसवण्यात आल्या आहेत.