North Korea Ban Laughing: उत्तर कोरियाचा  (North Korea) हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong-un)च्या अनेक विक्षिप्त निर्णयाबद्दल आपण ऐकून असतोच. आता आणखी एका निर्णयामुळं तो पुन्हा चर्चेत आला आहे. उत्तर कोरियात आता 11 दिवस हसण्यावर बंदी असणार आहे. जर लोकांनी सेलिब्रेशन केलं किंवा हसताना दिसले तर त्यांच्यावर आता कडक कारवाई होणार आहे. देशाचे माजी नेते आणि सध्याचा हुकुमशाह किम जोंग उनचे वडील किम जोंग-इल यांच्या 10 व्या पुण्यतिथिच्या निमित्ताने सरकारने लोकांच्या हसण्यावर बंदी घातली आहे. 
 
किम जोंग-इल (Kim Jong-il) च्या पुण्यतिथी निमित्त 11 दिवसांपर्यंत देशात कुणीही आनंद साजरा करु शकणार नाही. राष्ट्रीय शोक असल्यानं लोकांना हसणे आणि दारु पिण्यावर बंदी असणार आहे.  
 
एका रिपोर्टनुसार हुकुमशाह किम जोंग उनच्या आदेशानुसार 17 डिसेंबर म्हणजे आज लोकांना किराणा सामान खरेदी करण्याची देखील परवानगी नाही. आदेश न मानणाऱ्या लोकांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. सूत्रांनी सांगितलं की, राष्ट्रीय शोक (National Day of Mourning) असलेल्या काळात जर कुणी दारु प्यायलेलं किंवा नशा करताना पकडलं गेलं असेल तर तो व्यक्ति आजवर परत आलेला नाही.   सोबतच राष्ट्रीय शोक असताना जर कुणाच्या घरी मृत्यू झाला तर त्या परिवाराला जोरात रडण्याची देखील परवानगी नाही.  


सोबतच या काळात वाढदिवस आणि अन्य सोहळे सेलिब्रेट करण्याची देखील परवानगी नाही. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना अटक केलं जातं. त्यानंतर अटक केलेली लोकं परत कधीच दिसून येत नाहीत, असं सांगितलं जातं.  या काळात पोलिसांची लोकांवर करडी नजर असते. या दरम्यान जो व्यक्ति उदास दिसत नाही त्याला पोलिस अटक करतात. पोलिसांसाठी देखील हे 11 दिवस जिकरीचेच असतात.  


उत्तर कोरिया (South Korea) चा हुकूमशहा किम जोंग उन विचित्र निर्णयांमुळे कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यानं आपल्या देशातील लोकांसाठी एक नवा विचित्र नियम लागू केला आहे. हुकूमशहा किम जोंग उन त्याच्या आवडत्या लेदर कोटची कॉपी केल्यामुळे चांगलाच संतापला आहे. आता त्यानं देशात लेदर कोटच्या विक्रीवर आणि परिधान करण्यावरच बंदी घातली आहे. या नियमानंतर उत्तर कोरियामध्ये कोणालाही लेदर कोट विकता किंवा घालता येणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या 


Kim Jong Un : उत्तर कोरियामध्ये लेदर जॅकेट घालण्यावर बंदी, किम जोंग उनची नक्कल कराल तर... 



एक व्यथा अशीही... तब्बल 43 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता!