उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांनं देशात लेदर जॅकेट घालण्यावर बंदी घातली आहे. लेदर जॅकेट विकणाऱ्या दुकानांवरही बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी देशात फॅशन पोलिसांची तुकडीही तैनात करण्यात आली आहेत.
उत्तर कोरिया (South Korea) चा हुकूमशहा किम जोंग उन विचित्र निर्णयांमुळे कायमच चर्चेत असतो. किम जोंग उन यानं आपल्या देशातील लोकांसाठी एक नवा विचित्र नियम लागू केला आहे. हुकूमशहा किम जोंग उन त्याच्या आवडत्या लेदर कोटची कॉपी केल्यामुळे चांगलाच संतापला आहे. आता त्यानं देशात लेदर कोटच्या विक्रीवर आणि परिधान करण्यावरच बंदी घातली आहे. या नियमानंतर उत्तर कोरियामध्ये कोणालाही लेदर कोट विकता किंवा घालता येणार नाही.
एका रिपोर्टनुसार, किमने 2019 मध्ये पहिल्यांदा लेदर कोट घातला होता, त्यानंतर या कोटला देशभर पसंती मिळू लागली. यादरम्यान उत्तर कोरियाच्या आण्विक साठ्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा सुरु होती. किमच्या या लूकची दक्षिण कोरियाच्या मीडियामध्ये खूप चर्चा झाली. सुरुवातीला प्रत्येक वर्गातील लोकांना हे जॅकेट परवडणारे नव्हतं, त्यामुळे फक्त श्रीमंत वर्गातील लोकच लेदर जॅकेट घालायचे. पण हळूहळू स्वस्त दर्जाची लेदर जॅकेट लोकप्रिय होऊ लागली आणि आता प्रत्येक वर्गातील लोक ते घालू लागले. त्यामुळे किमने लेदर जॅकेटवरच बंदी आणली आहे.
नव्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी देशात अनेक फॅशन पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. लेदर जॅकेट विक्री करणारी दुकाने बंद करण्याचे आदेश या फॅशन पोलिसांना देण्यात आले आहेत. असं म्हटलं जातंय की, किम जोंग उन यांना भीती वाटते की, देशातील सर्व जनता त्यांच्यासारखा पोशाख घालून त्यांचं वर्चस्व आणि अधिकार कमी करत आहे.
लोकांना लेदर कोट न घालण्याच्या सूचना
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर कोरियातील पोलिसांनी लेदर कोट न घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. लेदर जॅकेटचे व्यापारी आणि दुकानदार सांगतात की, चीन आणि उत्तर कोरियामध्ये व्यापार सुरू झाल्यानंतरच कमी दर्जाचे आणि स्वस्त लेदर कोट येऊ लागले. लोकांनीही या कोटला चांगली पसंती दाखवली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वस्त चामड्याची ऑर्डर देण्यास सुरुवात केली.