स्टॉकहोम: यंदाच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा (Nobel Prize) करण्यात आली असून बेन बर्नानके (Ben S. Bernanke), डगलस डायमंड (Douglas W. Diamond) आणि फिलिप डायविग (Philip H. Dybvig) या अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आर्थिक संकटाच्या वेळी अर्थव्यवस्थेमध्ये बँकांची भूमिका (for research on banks and financial crises) या संबंधित या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला असून त्यासाठी या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं नोबेल समितीच्या वतीनं सांगितलं गेलं. 

Continues below advertisement


 






बँकिंग व्यवस्था समजून घेणं, बँकांचे नियमन, बँकिंग संकट काळात आर्थिक व्यवस्थापन कसं असावं, या संकटाला कशा पद्धतीने तोंड द्यावं याचा अभ्यास या तीन शास्त्रज्ञांनी केला आहे. 


आपल्या व्यवस्थेत बँकांची भूमिका काय, आर्थिक संकटाच्या काळात बँकांना कशा पद्धतीने कमी संवेदनशील करायचं याचा अभ्यास या तीन अर्थतज्ज्ञांनी केला आहे. तसेच बँकिंग व्यवस्थेते पतन हे अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने अडचणीत आणतं हे त्यांनी आपल्या अभ्यासातून दाखवून दिलं. 


अर्थशास्त्राचा नोबेल नंतर सुरू


सर आल्फ्रेड नोबेल यांनी 1895 साली एक हक्कपत्र तयार केलं आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार देण्यात यावी याची नोंद केली. त्यांच्या या यादीत सुरुवातील अर्थशास्त्रातील नोबेलची नोंद नव्हती. नंतरच्या काळात अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.