मुंबई : साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस्से यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांच्या लेखनासाठी त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आलं आहे. उपहासात्मक शैलीतील लिखाण एका वेगळ्या शैलीत लिहिलं. त्यांची हीच शैली पुढे 'फॉस मिनिमलिझम' या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यांची दुसरी कांदबरी 'स्टेंज्ड गिटार' जी 1985 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांच्या या शैलीची प्रकर्षाने जाणीव होते.
2022 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एरनॉक्स यांना देण्यात आला होता. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1940 रोजी झाला. फ्रेंच लेखिका तसेच फ्रेंच साहित्याच्या प्राध्यापिका म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. त्यांनी विशेषकरुन आत्मचरित्र आणि समाजाशास्त्रावर लिखाण केलं आहे.
जॉन फोस्से यांचे कार्य
नॉर्वेजियन निनॉर्स्कमध्ये लिहिलेल्या आणि विविध शैलींमध्ये पसरलेल्या त्यांच्या अफाट ओव्यामध्ये नाटके, कादंबरी, कविता संग्रह, निबंध, मुलांची पुस्तके आणि अनुवाद यांचा समावेश आहे. त्यांचा जन्म 1959 मध्ये नॉर्वे झाला. त्यांनी त्यांचे बहुतेक लिखाण हे नॉर्वेजियन निनॉर्स्कमध्ये लिहिलेले आहे. त्यामध्ये अनेक कथा नाटके, कादंबरी, कविता संग्रह, निबंध यांचा समावेश करण्यात आलाय.
'या' क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
वैद्यकशास्त्र, रसायशास्त्र आणि भौतिकशास्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा आतापर्यंत करण्यातआ आली आहे. वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील 2023 सालचा नोबेल पुरस्कार हा कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यांना प्रदान करण्यात आला आहे. तर भौतिकशास्त्र या क्षेत्रातील 2023 सालचा नोबेल पुरस्कार हा , पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्राउझ आणि अॅन ल'हुलियर यांना प्रदान करण्यात आला आहे. रसायनशास्त्र या क्षेत्रातील 2023 सालचा नोबेल पुरस्कार, माँगी जी. बॉएंडी , लुईस ई. ब्रुस आणि अॅलेक्सी आय. एकिमोव्ह यांना विभागून देण्यात आलाय.
वर्षभरामध्ये विविध क्षेत्रात ज्यांनी मानवतेसाठी मोलाचं कार्य केलं अशांचा गौरव हा नोबेल पुरस्कार देऊन केला जातो. स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. तर यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून आतापर्यंत रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकियशास्त्र आणि आता साहित्य या क्षेत्रांमधील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीये.