नवी दिल्ली : औषधशास्त्रामध्ये यावर्षीचा म्हणजे वर्षीचा 2021 चा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाले आहे. अमेरिकेचे शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलिअस (David Julius) आणि अॅर्डेम पटापाउटियन (Ardem Patapoutian) यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे.
अमेरिकेचे शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलिअस आणि अॅर्डेम पटापाउटियन यांना तापमान आणि स्पर्शामधील रिसेप्टर्सच्या संशोधनासाठी संयुक्तपणे नोबेल मेडिसीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्टॉकहोममधील (Stockholm) करोलिंस्का संस्थेच्या (Karolinska Institute) एका पॅनेलद्वारे घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मेडिसीनमध्ये हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना देण्यात आला होता. . रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या संशोधनासाठी गेल्या वर्षी या कॅटेगरीमध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कार व्यक्तीला एका सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर 1 कोटी स्वीडीश क्रोनर देखील देण्यात येतात. ज्याचे भारतीय 8.50 कोटी आहे. नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या :