Nityananda Kailasa Cons 30 US Cities : भारतातील फरार आरोपी नित्यानंद (Nityananda) याच्या मालकीचा स्वयंघोषित कैलासा देशामुळे (Kailasa Country) अमेरिकेची (America) डोकेदुखी वाढली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कैलासा देशाने अमेरिकेतील 30 शहरांसोबत सिस्टर सिटी (Sister City Agreement) करार केला आहे. कैलासाने अमेरिकेतील 30 शहरांसोबत फसवणूक करुन हा करार केल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे. फसवणूक झाल्यानंतर आता अमेरिकेच्या 30 शहरांना याचा पश्चात्ताप होत आहे. गांभीर बाब म्हणजे कैलासाने फसवणूक करुन सिस्टर सिटी करार केलेल्या 30 शहरांमध्ये अमेरिकेतील प्रमुख शहर फ्लोरिडा आणि नेवार्क ही देखील आहेत. या शहरांनी करार करताना त्यांना नित्यानंदच्या प्रकरणांची माहिती नव्हती.


कैलासा देशाचा अमेरिकेतील 30 शहरांसोबत फसवणूक करुन करार


सिस्टर सिटी कराराबाबत फसवणुकीची घटना समोर आली आहे. हा करार कोणत्याही दोन देशांतील दोन शहरांमधील केला जातो. यामुळे दोन शहरांमधील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध दृढ होतात. ड्वाइट डेव्हिड आयझेनहॉवर 1955 मध्ये निवडणूक जिंकून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेची सत्ता हाती घेतलेल्या आयझेनहॉवर यांनी सिस्टर सिटीज इंटरनॅशनल (SCI) करार ही संकल्पना सुरु केली.


स्वयंघोषित देश कैलासा


भारतात लैंगिक शोषणाचे आरोप असलेला नित्यानंद 2019 साली फरार होऊन इक्वेडोरच्या एका बेटावर गेला होता. मीडिया रिपोर्टनुसार, नित्यानंदने इक्वेडोरच्या किनार्‍याजवळ एक बेट विकत घेतलं आणि कैलास पर्वताच्या नावावरुन त्याचं नाव 'कैलासा' ठेवलं. हा हिंदूंसाठी पवित्र देश असल्याचा दावा नित्यानंदने केला आहे. नित्यानंदचा स्वयंघोषित देश कैलासा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. दरम्यान, या देशाबाबत अधिकची माहिती नाही. अलिकडे संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत कैलासा देशाच्या प्रतिनिधीने सहभाग घेतला. या कार्यक्रमात कैलासाने भारताविरोधी वक्तव्य केली. त्यानंतर स्वयंघोषित कैलासा देशाचा मुद्दा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.


भारतातील फरार आरोपी नित्यानंद 


स्वयंघोषित स्वामी नित्यानंद भारतातील फरार आरोपी आहे. नित्यानंदवर लैंगिक अत्याचार आणि अपहरणाचे गुन्हे दाखल आहे. स्वत:ला भगवान शंकर आणि विष्णूचा अवतार सांगणाऱ्या नित्यानंदने स्वत:चा वेगळा देश वसवला आहे. दरम्यान, या देशाला संयुक्त अमेरिकेत मान्यता नाही.


2019 मध्ये कैलासाची स्थापना


2019 मध्ये नित्यानंदने 'युनायटेड स्टेट कैलासा' ची स्थापना करण्याची घोषणा केली. कैलासाच्‍या वेबसाईटनुसार, 30 हून अधिक यूएस शहरांनी कैलास या स्वयंघोषित देशासोबत सांस्कृतिक भागीदारीचा करार केला आहे. वेबसाईटनुसार, या शहरांमध्ये फ्लोरिडा, नेवार्क या प्रमुख शहरांसह रिचमंड, व्हर्जिनिया, ओहायो, डेटन आणि बुएना पार्क यां शहरांचाही समावेश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kailasa | भारतातून 'कैलासा'मध्ये येणाऱ्या प्रवाशांवर बंदी; कोरोनामुळे स्वामी नित्यानंदचा निर्णय