New Zealand MP Laura McClure : काळाच्या ओघात आणि प्रगतीच्या वेगात पुढे जात असताना आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात क्रांति केली आहे. ही बाब जरी खरी असली तरी त्याची दुसरी बाजू आणि गैरवापर हा देखील मोठ्या चिंतेचा प्रश्न बनला आहे. डीपफेकच्या (Deepfake Picture) गैरवापर कुणाचे आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो हे पटवून देतांना न्यूझीलंडच्या खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी अतिशय धाडसी पाऊल उचलत याचा धोका अधोरेखित केला आहे.
न्यूझीलंडच्या खासदार लॉरा मॅकक्लूर (MP Laura McClure) यांनी संसदेत डीपफेक (AI-Generated Picture) तंत्रज्ञानाचे धोके अधोरेखित करण्यासाठी स्वतःचा एआय-निर्मित नग्न फोटो संसदेत सगळ्यांना दाखवलाय. एआय डीपफेकचा धोका उलगडून सांगताना मॅकक्लूरने घरी स्वतःची एआय-जनरेटेड नग्न फोटो तयार करून असं कारणं किती सहज आणि सोप्पं आहे, हे पटवून दिलं आहे. परिणामी, त्यांच्या या कृतीने संपूर्ण संसद स्तब्ध झाल्याचे बघायला मिळाले आहे.
खासदार लॉरा मॅकक्लूर इंस्टाग्रामवर व्हिडिओ चर्चेत
खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी या कृतीबद्दल स्पष्टीकरण देताना इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "सभागृहातील सर्वसाधारण चर्चेत मी संसदेच्या इतर सर्व सदस्यांचे लक्ष वेधले की, डीपफेकच्या गैरवापर करणे किती सोपे आहे आणि त्यामुळे किती गैरवापर आणि हानी होत आहे. विशेषतः आपल्या तरुणी आणि महिलांसाठी हे अधिक धोकादायक असल्याची शक्यता जास्त आहे." असेही त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या