Russia Ukraine War : एकीकडे युक्रेनने रशियावर सर्वात मोठा हल्ला केल्यानंतर या दोन देशांदरम्यान मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे मात्र युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधीमंडळामध्ये शांततेसाठी चर्चा झाली. तुर्कीमधील सिरागन पॅलेसमध्ये या दोन्ही देशाचे प्रतिनिधीमंडळ एकत्र भेटले आणि युद्धबंदीसाठी शांतता करारावर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कीच्या मध्यस्तीने झालेली ही चर्चा एक तासाहून अधिक काळ झाल्याची माहिती आहे. 

Russia Ukraine War : यु्द्ध कैद्यांना सोडण्यावर सहमती

युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी एकमेकांच्या कैद्यांना सोडण्यास सहमती दर्शविली आहे. युद्ध थांबवण्यासाठीच्या प्रमुख अटींबाबत दोन्ही देशांमध्ये अजूनही बरेच मतभेद आहेत. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांनी या शांतता चर्चेचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत तुर्की गुप्तचर संस्थेचे अधिकारीही उपस्थित होते.

Russia Ukraine Delegation Meeting : युक्रेनचा रशियावर हल्ला

युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला असून रशियाची 40 विमानं नष्ट केली आहेत. युक्रेनने हा हल्ला ड्रोनच्या माध्यमातून केला. युक्रेनने रशियाच्या मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इवानोवो, रियाझान आणि अमूर येथील हवाई तळांवर एफपीव्ही ड्रोन वापरून हल्ला केल्याची कबुली रशियाने दिली आहे. त्यावर आता रशियाकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा: