New Zealand Earthquake: न्यूझीलंडमध्ये (New Zealand) गुरुवारी (16 मार्च) 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGC) या जगातील भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटांवर 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. त्याची खोली 10 किमी इतकी होती. चीन अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने (CENC) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप न्यूझीलंडमध्ये चीनच्या वेळेनुसार, रात्री 8.56 वाजता झाला.


भूकंपानंतर न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशारा


यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर आत होता. भूकंपानंतर न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. 


USGS च्या निवेदनानुसार, गुरुवारी (16 मार्च) सकाळी न्यूझीलंडच्या उत्तरेकडील कर्माडेक बेटांवर 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंप 10 किमी खोलीवर होता. भूकंप समुद्रात झाला असल्याने भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटरच्या त्रिज्येत त्सुनामी येऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तशा इशाराही न्यूझीलंड प्रशासनाने दिला आहे. 






भूकंपप्रवण क्षेत्रात येतो न्यूझीलंड


न्यूझीलंडचा परिसर भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. न्यूझीलंडमध्ये दरवर्षी भूकंप होतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तो भूकंपीय क्रियाकलापांच्या क्षेत्राच्या काठावर वसलेला आहे, ज्याला रिंग ऑफ फायर म्हणतात. आज सकाळी झालेल्या भूकंपामुळे किती नुकसान झालं हे अद्याप समजू शकलेलं नाही.


फेब्रुवारीत तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचा हाहाकार 


6 फेब्रुवारी रोजी तुर्कस्तान (Türkiye) आणि सीरियामध्ये (Syria) भूकंप झाला होता. भूकंप खूप जोरदार होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होतं. हे सीरिया आणि तुर्कीच्या सीमेवर आहे. अशा स्थितीत या भूकंपामुळे दोन्ही देशांत प्रचंड विध्वंस झाला. यामध्ये 50 हजार लोकांचा मृत्यू झाला. 


सीरिया-तुर्कीमध्ये भूकंपामुळे 47,000 इमारतींचं नुकसान 


एएफएडीच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे सीरिया-तुर्कीमध्ये एकूण 47,000 हून अधिक इमारती कोसळल्या आहेत किंवा नुकसान झालं आहे. भूकंपग्रस्त भागातून 196,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत आलं आहे. शाळा, रुग्णालयं आणि इतर वैद्यकीय, प्रसुती आणि शैक्षणिक सुविधांसह अत्यावश्यक सेवा भूकंपामुळे नष्ट झाल्या आहेत. एका मूल्यमापनानुसार, सातपैकी फक्त एक कुटुंब आरोग्य केंद्र कार्यरत आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या मते, 2 लाखांहून अधिक गर्भवती महिलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


धोक्याची घंटा! संपूर्ण पृथ्वीलाच प्रदूषणाचा विळखा, प्रदूषण नसलेलं एकही ठिकाण नाही; संशोधनातून धक्कादायक खुलासा