Prediction Regarding America Earthquake : नवीन नास्त्रेदमसने अमेरिकेबाबत (America) मोठी भविष्यवाणी केली असून सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. नवीन नास्त्रेदमस नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रेग हॅमिल्टन पार्कर (Craig Hamilton Parker) यांनी अमेरिकेवर मोठ संकट (New Nostradamus Prediction For America) येणार असल्याचं भाकित केलं आहे. पुढील वर्षी अमेरिकेत मोठा भूकंप (Earthquake) किंवा नैसर्गिक आपत्ती येणार असल्याची भविष्यवाणी पार्कर यांनी केली आहे.


'2024 मध्ये विनाशकारी भूकंप, अनेक शहरे नष्ट होणार' 


भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिकेतील अनेक शहरं नष्ट होतील, असं क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी म्हटलं आहे.  नैसर्गिक संकटामुळे अमेरिकेतील बहुतेक भागात ब्लॅक आऊट होईल. अनेक शहरांमध्ये अंधार होईल. मोठं नैसर्गिक संकट किंवा आपत्तीमुळे अनेक शहरांमधील वीज पुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधा नष्ट होतील, परिणामी सर्वत्र ब्लॅक आऊट होईल.


अमेरिकेसाठी नव्या नास्त्रेदमसची भविष्यवाणी


क्रेग हॅमिल्टन पार्कर यांना नवे नास्त्रेदमस नावाने ओळखलं जातं. क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी त्यांच्या 'कॉफी विद क्रेग' या यूट्यूब चॅनलवर नवा व्हिडीओ अपलोड करत अमेरिकेबाबत धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. यूट्यूब चॅनलवरील व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेत मोठा विध्वंस होणार आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये मोठा ब्लॅकआउट होणार आहे. 


अमेरिकेत भूकंपामुळे शहरे उद्ध्वस्त होतील


2024 मध्ये अमेरिकेत अनेक मोठे भूकंप होतील, असा दावा क्रेग यांनी भविष्यवाणीत केला आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टीवर अनेक शहरं नष्ट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. क्रेग यांनी म्हटलं आहे की, "मला दिसत आहे की पश्चिम किनारपट्टीपर्यंत प्रचंड भूकंप आणि नैसर्गिक घटना घडतील, ज्यामुळे बरेच काही नष्ट होणार आहे. 2024 मध्ये जे काही होईल ते हृदय पिळवटून टाकणारे असेल."


नास्त्रेदमसचे भाकीत खरं ठरलं


नास्त्रेदमस हा फ्रान्सचा 16 व्या शतकातील भविष्यकार होता. नास्त्रेदमसच्या अनेक भविष्यवाण्या पूर्णपणे खरे ठरल्या आहेत. रशियन युद्धाचं भाकीतही नास्त्रेदमसने फार पूर्वीच केले होते आणि नैसर्गिक घटनांशी संबंधित अनेक भाकीतही खरी ठरली आहेत.


नवे नास्ट्रेदमस क्रेग हॅमिल्टन पार्कर


क्रेग हॅमिल्टन पार्कर हे नवी नास्ट्रेदमस म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर विविध व्हिडीओ अपलोड करत वेगवेगळ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांची ही भाकित खरी ठरतात की नाही, हे चित्र येत्या काळातच स्पष्ट होईल.