ICC Cricket World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वानखडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा पहिला सामना होणार आहे. 2019  च्या विश्वचषकात या दोन संघामध्येच सेमीफायनलचा सामना झाला होता. त्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता, त्यामुळे राखीव दिवशी सामना खेळवण्यात आला होता. त्यामुळे न्यूझीलंडने भारताचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. यंदाच्या विश्वचषकातही भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्येच सेमीफायनलचा सामना होणार आहे. पण 15 नोव्हेंबर रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यावेळी पाऊस आला तर काय होणार ?


भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनल 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन्ही सेमीफायनलसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. 


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलमध्ये पाऊस आला तर ?


आयसीसीने दोन्ही सेमीफायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात पावसाने खोडा घातला, तर सामना राखीव दिवशी म्हणजेच 16 तारखेला होईल. जर 16 तारखेलाही सामना झाला नाही.. तर गुणतालिकेत आघाडीवर असणाऱ्या संघाला विजयी घोषीत करण्यात येईल. 


गुणतालिकेत भारतीय संघ 16 गुणांसह आघाडीवर आहे. भारतीय संघाचा आज अखेरचा सामना आहे. हा सामनाही जिंकला तर भारताकडे 18 गुण होतील. भारतीय संघ गुणतालिकेत नंबर 1 स्थानावरच राहणार आहे. त्यामुळे सेमीफायनलचा सामना पावसामुळे झाला नाही तर भारतीय संघाला फायनलचं तिकिट मिळणार आहे. 


दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यात पाऊस आला तर ?


दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. या सामन्यासाठीही आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. 16 तारखेला पावसाने हजेरी लावली तर सामना 17 तारखेला खेळवण्यात येईल. पण 17 तारखेलाही पावसामुळे सामना झाला नाही तर गुणतालिकेत आघाडीवर असणाऱ्या संघाला फायनलचं तिकिट मिळणार आहे. 
 
दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांचे 14 - 14 गुण आहेत. पण आफ्रिकेचा रनरेट चांगला असल्यामुले ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर दुसरा सेमीफायनल सामना राखीव दिवशीही झाला नाही, तर दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलचे तिकिट मिळेल. 


दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही सेमीफायनलचे सामने पावसामुळे रद्द झाले तर 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगेल.