Nepal Plane Crash Viral Video : नेपाळ विमान दुर्घटनेमध्ये (Nepal Plane Crash) पाच भारतीयांसह 72 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दुर्घटनेआधी विमानाचं नियंत्रण बिघडल्याचं दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेपाळच्या पोखरा विमानतळाजवळ हा मोठा विमान अपघात होण्यापूर्वीच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ समोर आला आहे.
रविवारी यती एअरलाइन्सच्या विमानात बसलेल्या पाच भारतीय प्रवाशांपैकी एक प्रवाशी पोखरामध्ये विमान क्रॅश होण्याच्या काही क्षण आधी फेसबुकवर लाइव्ह होता. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, यती एअरलाइन्सचे विमान पोखरा विमानतळाच्या दिशेने जात असताना अचानक विमानाचे नियंत्रण बिघडते आणि ते खाली कोसळते आणि त्यानंतर आग लागल्याचे दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ : नेपाळ विमान दुर्घटनेआधीचा शेवटचा क्षण
आणखी एक व्हिडीओ व्हायरल
नेपाळ विमान दुर्घटनेचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पोखरा विमानतळाजवळ विमान क्रॅश होण्यापूर्वी दुर्घटनास्थळाजवळील इमारतीच्या छतावरून रेकॉर्ड करण्यात आला आहे. प्राथमिक अहवालानुसार, विमानाचे नियंत्रण सुटले आणि ही दुर्घटना घडली. विमान अपघात स्थळापासून काही अंतरावर असलेल्या इमारतीच्या छतावरून काढण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एटीआर-72 विमान हवेत हेलखावे खाताना आणि त्यानंतर कोसळताना दिसत आहे.
पाच भारतीयांसह 72 जणांचा मृत्यू
नेपाळमधील पोखरा येथे रविवारी झालेल्या भीषण विमान अपघातात पाच भारतीयांसह 72 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या विमानात चार क्रू मेंबर्ससह एकूण 72 लोक होते. यती एअरलाईन्सचे हे विमान पोखरा विमानतळाजवळील सेती नदीच्या दरीत कोसळले. अंधारामुळे बचावकार्य थांबवावे लागले. 21 मृतदेहांची ओळख पटली आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून तपासात खरं कारण समोर येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या