Kathmandu Aircraft Crash : नेपाळची राजधानी काठमांडू येथे बुधवारी सकाळी विमान कोसळले. विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला. जखमी पायलट कॅप्टन एम. शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. काही क्षणातच ते कोसळले. 9N-AME हे विमान सौर्य एअरलाइन्सचे होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १७ जण सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित २ क्रू मेंबर्स होते.


अपघातात ठार झालेल्या 18 जणांपैकी तीन जण एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये मुन राज शर्मा, त्यांची पत्नी प्रीजा खतिवडा आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा आदि राज शर्मा यांचा समावेश आहे. हे 21 वर्षे जुने विमान दुरुस्त करून चाचणीसाठी नेले जात होते. विमानात उपस्थित असलेले लोक कंपनीचे चाचणी कर्मचारी होते. काठमांडू पोस्टनुसार, अपघातानंतर लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर विमानाला आग लागली. ते लगेचच विझवण्यात आले. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट उठताना दिसत आहेत. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.






विमान टेकऑफच्या वेळी धावपट्टीवरून घसरले 


काठमांडू पोस्टनुसार, राजधानीच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सच्या विमानाचा  अपघात झाला. विमानतळावरील सूत्रांच्या हवाला देत काठमांडू पोस्टने लिहिले की, टेक-ऑफ दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले, त्यामुळे हा अपघात झाला. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते आणि त्यात एकूण 19 प्रवासी होते. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि आकाशात धुराचे प्रचंड ढग पसरले. अपघातामुळे विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे.


लष्कराचे जवान घटनास्थळी


अपघाताची माहिती मिळताच सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराचे जवान घटनास्थळी पाठवले. वैद्यकीय आणि लष्कराचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले. पायलटला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बचावकार्य करतानाचे फोटो समोर आले आहे. विमानाचा अपघात झाल्यानंतर आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत असल्याचं दिसतेय. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  


हे ही वाचा :


Belgaon School Bus Accident: बेळगावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी,अपघाताचं कारण आलं समोर