Anju Khativada Death in Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमानाचा मोठा दुर्देवी अपघात झाला. या दुर्घटनेत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. यती एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात होऊन ही दुर्घटना घडली. या विमानाच्या सहवैमानिक (Co-pilot) अंजू खतिवडा (Anju Khtivada) यांचंही या विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. दुर्दैवी योगायोग म्हणजे 16 वर्षांपूर्वी यती एअरलाईन्सच्या विमान अपघातामध्येच अंजू यांच्या पतीचाही मृत्यू झाला होता. अंजू यांचे पती दीपक यती एअरलाईन्समध्ये सहवैमानिक होते. या दुर्घटनेमध्ये पाच भारतीयांसह 72 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


16 वर्षांपूर्वी प्लेन क्रॅशमध्येच पतीचा मृत्यू


दुर्घटनाग्रस्त यती एयरलाईन्सच्या एटीआर-72 या विमानामध्ये को-पायलट अंजू यांचाही मृत्यू झाला. हा अपघातही लँडीगपूर्वी घडला. या विमानामध्ये 68 प्रवासी आणि चार क्रूमेंबर्स होते. यामधील एक को-पायलट अंजू यांची कहाणी काहीशी वेगळी आहे. अंजू यांचे पती दीपक पोखरेल यांचाही 16 वर्षांपूर्वी यती एअरलाइन्सच्याच विमान अपघातात मृत्यू झाला होता. दीपक हेही सहवैमानिक म्हणून कार्यरत होते.


विमान अपघातात 72 जणांचा मृत्यू


यती एअरलाईन्सच्या विमान अपघातामध्ये को-पायलट पती आणि पत्नीने जीव गमावला. पत्नी अंजूचा मृत्यू 15 जानेवारी 2022 रोजी आणि पतीचा मृत्यू 16 वर्षांपूर्वी प्लेन क्रॅशमध्ये झाला होता. योगायोग म्हणजे दोन्ही अपघातग्रस्त विमान यती एअरलाईन्सचे होते. पती दीपक यांच्या मृत्यूवेळी अंजू यांचे वय 28 वर्ष होते. नेपाळमध्ये रविवारी 15 जानेवारी रोजी मोठी दुर्घटना घडली. या विमानातील 72 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 69 जणांचे मृतदेह सापडले आहेत. विमानातील सर्व जणांचा दुर्दैवी अंत झाला. आहे.


पती दीपक यांची आठवण म्हणून व्हायचे होते पायलट


को-पायलट पती दीपक यांची आठवण म्हणून अंजू यांनाही पायलट व्हायचे होते. अंजू यांचे को-पायलट म्हणून हे शेवटचे उड्डाण होते. यानंतर त्या पायलट होणार होत्या. पण हे उड्डाण अंजू यांच्या आयुष्यातील शेवटचे उड्डाण ठरले. अंजू 2010 साली यती एअरलाईन्समध्ये रुजू झाल्या. सध्या त्या सहवैमानिक पदावर कार्यरत होत्या.


दीपक यांचा मृत्यू कसा झाला?


दीपक पोखराल हे अनुभवी वैमानिक होते. दीपक नेपाळ सैन्य दलात वैमानिक होते. अंजू यांच्यासोबत लग्नानंतर ते यती एअरलाईन्समध्ये रुजू झाले. त्यांच्या 2006 साली विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. ही दुर्घटना नेपाळच्या जुमला जिल्ह्यात घडली होती. 2006 रोजी यती एअरलाईनच्या विमान अपघातामध्ये दोन पायलटसह एकूण नऊ सर्व जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघातही लँडीगपूर्वी घडला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Nepal Plane Crash : ...तो शेवटचा क्षण, नेपाळ विमान दुर्घटनेआधीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ; 72 जणांचा दुर्दैवी अंत