X-59 Aircraft Ready To Fly : जगातील पहिलं सुपरसॉनिक विमान (Supersonic Aircraft) उड्डाणासाठी सज्ज झालं आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) ने X-59 नावाचं सुपरसॉनिक विमान तयार केलं आहे. नासाने दावा केला आहे की, हे सुपरसॉनिक विमान फक्त 39 मिनिटांमध्ये 15 तासांचं अंतर पार करू शकते. X-59 हे जगातील पहिलं सुपरसॉनिक विमान पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांमधील अंतर सुमारे दोन तासात पूर्ण करू शकते. 


जगातील पहिलं सुपरसॉनिक विमान उड्डाणासाठी सज्ज


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीने नासासाठी X-59 शांत सुपरसॉनिक विमान बनवलं आहे. सुपरसॉनिक विमान X-59 ला 'सन ऑफ कॉनकॉर्ड' (Son Of Concord) म्हटलं जात आहे. हे सुपरसॉनिक विमान 'कॉनकॉर्ड' (Concord) विमानाचाच छोटा प्रकार आहे.


नासा आज या सुपरसॉनिक विमानाची चाचणी करणार आहे. हे सुपरसॉनिक विमान कॉनकॉर्डपेक्षा आकाराने लहान आणि याचा वेगही थोडा कमी असणार आहे. हे विमान ताशी 1500 किलोमीटर वेगाने न्यूयॉर्क ते लंडन प्रवासाचा वेळ सुमारे 3:30 तासांनी कमी वेळात पार करेल.


वीस वर्षांपूर्वी कॉन्कॉर्ड करण्यात लाँच


विशेष म्हणजे, वीस वर्षांपूर्वी जगातील पहिलं 'सुपरसॉनिक विमान कॉनकॉर्ड' लाँच करण्यात आलं होतं. हे विमान न्यूयॉर्क ते लंडनला 3 तासांपेक्षा कमी वेळेत पार करू शकत होतं. तेव्हा या सुपरसॉनिक विमानाचा वेग ताशी 2172 किलोमीटर होता. पण, 2000 मध्ये एक हायप्रोफाईल अपघात झाला आणि त्यानंतर या विमान तयार करणं थांबवण्यात आलं.


'सन ऑफ कॉनकॉर्ड' आता उड्डाणासाठी सज्ज 


आता जवळपास 20 वर्षांनंतर नासा 'सन ऑफ कॉनकॉर्ड' लाँच करण्यात येत आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, X-59 सुपरसॉनिक विमान कॉनकॉर्ड विमानापेक्षा आकाराने लहान आणि हळू असेल. ते ताशी 1500 किलोमीटर वेगाने उड्डाण करेल. X59 सुपरसॉनिक विमान फक्त 39 मिनिटांत 15 तासांचे सामान्य उड्डाण पूर्ण करू शकते. लंडन ते सिडनी जाण्यासाठी 22 तास लागतात, जे या विमानाद्वारे 2 तासांपेक्षा कमी वेळेत पार करता येईल.


न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, नासाने विकसित केलेले एक्स-59 'सन ऑफ कॉनकॉर्ड' हे सुपरसॉनिक विमान आता पहिल्या चाचणी उड्डाणासाठी सज्ज झालं आहे. असा अंदाज आहे की सबर्बिटल फ्लाइट्स 2 तासांच्या आत पृथ्वीवर कुठेही पोहोचू शकतात.


स्पेसएक्स कंपनीही तयार करतेय सुपरसॉनिक विमान


एलॉन मस्क यांच्यासारखे अनेक उद्योगपती सुपरसॉनिक विमान तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. महत्त्वाचे म्हणजे 2020 मध्ये एलॉन मस्क यांची कंपनी SpaceX ने आपल्या स्टारशिप रॉकेटची घोषणा केली होती. त्यानुसार दावा करण्यात आला होता की, हे विमान एका तासापेक्षा कमी वेळेत 100 प्रवाशांना एका खंडातून दुसऱ्या खंडात नेण्यास सक्षम असेल.