NASA DART Mission : नासाने (NASA) इतिहास रचला आहे. नासाने प्रथमच प्लॅनेटरी डिफेन्स टेस्ट म्हणजेच डार्ट मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. नासाच्या डार्ट मिशनची डायमॅारफस लघुग्रहाशी यशस्वी टक्कर झाली. आता जर भविष्यात पृथ्वीवर काही लघुग्रहांचा हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली. तर या तंत्राने पृथ्वी वाचवता येईल. कारण भविष्यात आपल्या पृथ्वीला धोका निर्माण करणारी कोणतीही गोष्ट असेल तर ती लघुग्रह आहे. यानंतर हवामान बदल किंवा ग्लोबल वार्मिंग या गोष्टी प्रामुख्याने आहेत. 


 






पृथ्वीवरील महासंकट दूर झालं
27 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 4.45 वाजता डार्ट मिशनची टक्कर चंद्रासारख्या दिसणाऱ्या डायमॅारफस या लघुग्रहाशी झाली. नासाच्या अवकाश यानाने पृथ्वीवर येऊन धडकणाऱ्या लघुग्रहाच्या ठिकऱ्या उडवल्या. डायमॅारफस या लघुग्रहाचा वेध नासाच्या डार्टप्रोब ने घेतला. या प्रक्रियेत नासाचं यानही नष्ट झालं, यामुळे पृथ्वीवर येणारे महासंकट दूर झालं आणि नासाचा DART म्हणजे (Double Asteroid Redirection Test)हा उद्देश पूर्ण झाला. दरम्यान डायमॅारफस कोणत्या दिशेने वळत आहे? त्याचा डेटा यायला थोडा वेळ लागेल. असं नासाकडून सांगण्यात आलं आहे.


डार्ट मिशनचे अंतराळयान ताशी 22,530 किमी वेगाने डिमॉर्फोसला धडकले


डार्ट मिशनची टक्कर Didymos लघुग्रहाच्या चंद्र Dimorphos शी झाली. जर डिमॉर्फोसने आपली दिशा आणि कक्षा बदलली तर भविष्यात पृथ्वीवर अवकाशातून आपल्या दिशेने येणारा असा कोणताही धोका नसेल. डार्ट मिशनचे अंतराळयान ताशी 22,530 किलोमीटर वेगाने डिमॉर्फोसला धडकले. टक्कर होण्यापूर्वी, डार्ट मिशनने डिमॉर्फोस आणि लघुग्रह डिडिमॉसचे वातावरण, माती, दगड आणि रचना यांचा देखील अभ्यास केला होता. या मिशनमध्ये कायनेटिक इम्पॅक्टर तंत्राचा देखील वापर करण्यात आला होता.


अवकाशात पृथ्वीला धोका असणारे दगड


डिडिमॉसचा एकूण व्यास 2600 फूट आहे. डिमॉर्फोस त्याच्याभोवती फिरतो. त्याचा व्यास 525 फूट आहे. टक्कर झाल्यानंतर दोन्ही दगडांच्या दिशेत आणि वेगातील बदलांचा अभ्यास केला करण्यात येणार आहे. नासाने पृथ्वीभोवती 8000 पेक्षा जास्त निअर-अर्थ ऑब्जेक्ट्स (NEO) नोंदवले आहेत. म्हणजेच असे दगड जे पृथ्वीला धोका देऊ शकतात. यापैकी काही 460 फूट व्यासापेक्षा मोठे आहेत. म्हणजेच यापैकी एकही दगड पृथ्वीवर पडला तर तो संपूर्ण राज्याचा नाश करू शकतो. 2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीपेक्षाही भयंकर आपत्ती समुद्रात पडणे अशी घटना घडू शकते.


..तर हे मिशन अयशस्वी झाले असते
इटालियन क्यूबसॅट फॉर इमेजिंग अॅस्टरॉयड्स (LICIACube) ने या मोहिमेदरम्यान डार्ट स्पेसक्राफ्टचे निरीक्षण केले. यात अतिवेगाने अंतराळयानाला धडकता आले नाही. धोका असा होता की, डिमॉर्फॉसशी टक्कर होण्याऐवजी ते अंतराळात दुसऱ्या दिशेने जाऊ शकते. त्यामुळे हे मिशन अयशस्वी झाले असतो. जर डिमॉर्फॉसच्या स्थितीत एक अंशाचा कोन बदलला तर आपण त्याच्या आघातापासून वाचू. असं नासाकडून सांगण्यात आले आहे.