Russia Ukraine War : "मी गाढ झोपलो, म्हणून मी वाचलो," मायकोलायव्हचे गव्हर्नर विटाली किम यांनी एक कठीण प्रसंग सांगितला आहे. युक्रेनमधील मायकोलायव्ह येथील गव्हर्नरच्या इमारतीवर बुधवारी रशियन क्षेपणास्त्राने हल्ला केला, ज्यात अनेक लोक ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. मीडीया रिपोर्टनुसार, हल्लेखोरांचे उद्दिष्ट राज्यपाल विटाली किम होते, जे या हल्ल्यापासून वाचले आहेत,  याचे कारण म्हणजे कामाला उशीर झाल्यामुळे ते गाढ झोपले होते.


हल्ला झालेल्या इमारतीत किम यांचे कार्यालय


किम, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की प्रमाणेच, युद्धकाळात एक विरोधक आणि शूर अधिकारी म्हणून किम हे नावाजलेले आहेत, हल्ला झालेल्या इमारतीत त्यांचे कार्यालय होते, टाइम्सने याबाबत एक वृत्त दिले. ज्यात म्हटलंय, "रशियन हल्लेखोराने प्रादेशिक प्रशासनाच्या इमारतीवर हल्ला केला आणि या इमारतीचा अर्धा भाग पाडला, क्षेपणास्त्र किम यांच्या कार्यालयावर आदळले. यात बरेच लोक वाचले," यानंतर विटाली किम यांनी प्रथम टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या संदेशात आणि नंतर सोशल मीडियाद्वारे याबाबत पोस्ट केली आहे.


"मी गाढ झोपलो होतो, म्हणून मी नशीबवान"


वृत्तात म्हटलंय, हल्ल्यानंतर घेतलेले फुटेज आणि छायाचित्रे इमारतीच्या बाजूला एक छिद्र दाखवतात. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असून बचावकार्य सुरू आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी डॅनिश संसदेला व्हिडिओ संबोधित करताना या हल्ल्याबद्दल सांगितले असल्याचे सांगण्यात येत आहे. झेलेन्स्की म्हणाले, "मायकोलायव्हमध्ये कोणतेही लष्करी लक्ष्य नव्हते, "मायकोलायव्हच्या लोकांना रशियाला कोणताही धोका नव्हता. आणि असे असूनही, युक्रेनियन लोकांप्रमाणे ते रशियन सैन्य, रॉकेट, हवाई बॉम्ब, यांचे लक्ष्य बनले" रशियाने युक्रेनमध्ये हल्ला करत शेजारच्या देशाला नि:शस्त्र करण्यासाठी "विशेष लष्करी ऑपरेशन" म्हटलंय. 


36 व्या दिवशीही युद्ध सुरू


रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine) 36 व्या दिवशीही युद्ध सुरू आहे. या भीषण संघर्षात मोठ्या प्रमाणात लष्कराचे जवान आणि नागरिक मारले जात आहेत. दरम्यान, रशियाने आज युक्रेनमधील मारियुपोल (Mariupol) येथे युद्धविराम जाहीर केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शहरात 5000 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनियन शहरातील मारियुपोलमधील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक युद्धविराम जाहीर केला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सांगितले की मारियुपोल ते झापोरिझ्झ्यापर्यंतचा मानवतावादी कॉरिडॉर रशियन-नियंत्रित बुर्डियनस्क बंदरातून गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल.


संबंधित बातम्या


Russia Offer to India : रशियाने भारताला दिली खास ऑफर, अमेरिकन निर्बंधही होतील निष्प्रभ


Russia Ukraine War : युक्रेनचा मोठा दावा, 17 हजार रशियन सैन्य ठार, 605 रणगाडे उद्धवस्त


Russia Ukraine War : पुतिन-झेलेन्स्की समोरासमोर भेटणार? रशिया-युक्रेनच्या शिष्टमंडळामध्ये झाली चर्चा