Mother’s Day 2021: आई या शब्दापेक्षा सुंदर शब्द या जगात कोणताच नाही असं कुणीतरी म्हटलंय आणि त्याचा प्रत्यय जगभरातील प्रत्येकाला आला असेल. आपल्या आयुष्यात आईचे स्थान हे सर्वात वरचे आहे. आईचे उपकार आपण आयुष्यभरासाठी विसरू शकत नाही. आईचे आपल्या मुलांवर असणारे प्रेम हे निस्वार्थ, सेवा आणि त्यागाचे प्रतिक असते. या मातांचा सन्मान करण्यासाठी जगभरात विविध देशात विविध दिवशी मदर्स डे साजरा केला जातोय. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी बहुतांश देशांमध्ये मदर्स डे साजरा करण्यात येतो. 


भारतात दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातोय. या वर्षी मे महिन्याच्या 9 तारखेला म्हणजे आज मदर्स डे साजरा करण्यात येईल. 


का साजरा केला जातो मदर्स डे?
मदर्स डे साजरा करण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. काहींच्या मते, मदर्स डे साजरा करण्याची प्रथा ही ग्रीसमध्ये सुरू झाली. प्राचीन ग्रीकच्या संस्कृतीत मातांना महत्वाचं स्थान होतं, त्यांचा सन्मान केला जायचा. ग्रीसमध्ये मातांची पूजा केली जायची. तर काही ठिकाणी असं सांगण्यात येतंय की यूनानमध्ये वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी रिहा या देवताच्या आईचा सन्मान केला जातो. तेव्हापासून मदर्स डे साजरा केला जातोय. 16 व्या शतकात इंग्लंडच्या ख्रिश्चन समुदायाने येशूची आई म्हणजे मदर मेरीच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. 


अमेरिकन तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी 8 मे 1914 साली हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून जगभरात दर वर्षी मे महिन्यात दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. 


महत्वाच्या बातम्या :