Miss Universe Crown And Prize Money : चंदीगढ गर्ल हरनाज संधूनं (Harnaaz Sandhu) विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे. 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस दीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाजने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाज भारताची मान जागतिक स्पर्धेत उंचावत 'Miss Universer 2021' किताबाची मानकरी ठरली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं (Lara Dutta) विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता. विश्वसुंदरीला मिळणाऱ्या मुकुटाबाबत अनेकांना जाणून घ्यायचे असते. विश्वसुंदरी ठरणाऱ्या स्पर्धकाला किती पैसे मिळतात? त्यांना आणखी काही सुविधा मिळतात का? असे प्रश्न अनेकांच्या मनात पडतात. जाणून घेऊयात मिस यूनिवर्स ठरणाऱ्या हरनाजला मिळालेल्या क्राऊनबाबत-
Miss Universe 2021 क्राऊनची डिझाइन-
हरवनाजने पटकवलेला क्राऊन हा 2019 मध्ये मिस यूनिवर्स ऑर्गेनाइजेशनच्या Mouawad Jewelry यांनी तयार केला आहे. हा क्राऊन बदलला जातो. सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि लारा दत्ता यांच्या वेळी क्राऊनची डिझाइन वेगळी होती.
Miss Universe 2021 क्राऊनची किंमत-
मिस यूनिवर्स ठरलेल्या हरवनाजला मिळालेला क्राऊन हा 5 मिलियन यूएस डॉलर्सचा म्हणजेच जवळपास 37 कोटी रूपयांचा आहे.
Miss Universe 2021 क्राऊनबद्दल काही खास गोष्टी-
मिस यूनिवर्सला मिळालेला क्राऊन हा 18 कॅरेट सोन्याचा वापर करून तायर केला आहे. या क्राऊनमध्ये 1770 हिरे आहेत. तसेच या क्राऊनच्या मध्यभागी शिल्ड-कट गोल्डन डायमंड आहे.
मिस यूनिवर्स ऑर्गेनायजेशन ही मिस यूनिवर्सला मिळणाऱ्या प्राइज मनी कोणतीही माहिती देत नहित. पण एका रिपोर्टनुसार, मिस यूनिवर्सला अनेक सुविधा दिल्या जातात. मिस यूनिवर्सला न्यूयॉर्कमधील मिस यूनिवर्स अपार्टमेंटमध्ये एक वर्ष राहण्याची परवानगी असते. या अपार्टमेंटमध्ये मिस यूनिवर्सला मिस यूएसएसोबत राहावे लागते. त्या घरामध्ये सर्व सामान आणि वस्तू असतात. तसेच मिस यूनिवर्सला एक असिस्टेंट्स आणि मेक-अप आर्टिस्टची एक टीम दिली जाते. तसेच तिला ट्रॅव्हलिंग प्रिव्हीलेज, डेंटल सर्विस, न्यूट्रिशन, डर्मटोलॉजी आणि प्रोफेशनल स्टाइलिस्ट या मोफत सुविधा दिल्या जातात.
इतर बातम्या :