नवी दिल्ली : अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या 11 वर्षीय मुलीने आपल्या हुशारीमुळे तब्बल 70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मिकाईला उल्मेर असं या 11 वर्षीय मुलीचं नाव आहे. होल फूड स्टोअर्ससोबत आपल्या ‘लेमनेड’ (लिंबू-पाणी) ब्रँडच्या विक्रीचं करार केलं आहे.


 

‘बी स्वीट’ नावाचं हे पेय आता टेक्सास, ओकलाहोमा, अरकन्सास आणि लुइसियाना येथील स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. मिकाईला उल्मेर एबीसी टीव्हीच्या ‘शार्क टँक’ या कार्यक्रमात 60 हजार डॉलर सीड पैशांच्या स्वरुपात जिंकली. हे कार्यक्रम बिझनेस आयडियाद्वारे फंडिंग जिंकण्याची संधी देतं.

 

गूगलच्या ‘डेयर टू बी डिजिटल कॅम्पेन’च्या माध्यमातून मिकाइलाने शोनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही आपल लेमनेड सर्व्ह केलं. मिकाईलाने लेमनेड बनवण्यासचा फॉर्म्युला घरातूनच परंपरेने तयार केला आहे. विशेष म्हणजे या लेमनेडमध्ये मधाचाही वापर केला जातो.

 

मिकाईला लहान असताना तिच्यावर मधमाशांनी दोनदा हल्ला केला होता. तेव्हापासून तिला मधमाशांची प्रचंड भीती वाटत असे. मात्र, कालांतराने मिकाईलाने मधमाशांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला मधमाशांबद्दल एकप्रकारची ओढ, कुतूहल निर्माण झालं. तेव्हा मिकाईलाने ठरवलं की, घरात परंपरेने चालत आलेल्या लेमनेडमध्ये मध मिसळून काय होतंय ते पाहूया आणि यातून मिकाईलने लेमनेड तयार केलं.