Earth neighbour planet :  संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार शुक्र (Venus) हा पृथ्वीसाठी (Earth) सर्वात जवळचा ग्रह नाही; तर बुध ग्रह (Mercury) हा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. सरासरी, बुध हा आपल्या सौरमालेतील इतर ग्रहांच्या सर्वात जवळ असल्याचं अभ्यासातून समोर आले आहे. 


पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?


बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आणि आपल्या सौरमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. या लहान ग्रहाला स्वतःचा चंद्र नाही आणि तो सूर्याभोवती इतर सर्व ग्रहांपेक्षा वेगाने फिरतो, म्हणूनच रोमन लोकांनी त्याचे नाव swift-footed असे ठेवले. बुध हा पृथ्वीनंतरचा दुसरा सर्वात घनता असलेला ग्रह आहे, ज्यामध्ये एक प्रचंड धातूचा गाभा अंदाजे 2,200 ते 2,400 मैल (3,600 ते 3,800 किलोमीटर) रुंद किंवा या ग्रहाच्या व्यासाच्या सुमारे 75% आहे. त्या तुलनेत, बुधाचे बाह्य कवच फक्त 300 ते 400 मैल (500 ते 600 किमी) जाड आहे. असं म्हणतात की पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह हा दिवस, महिना किंवा वर्षानुसार बदलत असतो. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे याचे वर्णन करणे तसे कठीण आहे. प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती स्वतःची कक्षा असल्यामुळे आणि प्रत्येक कक्षाची लांबी वेगळी असल्याने, सर्व ग्रहांचे कालावधी वेगवेगळे असतात जे एक वर्ष दर्शवतात.


मंगळ हा शुक्रापेक्षा पृथ्वीच्या जवळ होता


जेव्हा शुक्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असतो तेव्हा तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या काळात शुक्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह असतो. काही वेळेस मंगळ हा सर्वात जवळचा ग्रह असतो. ऑगस्ट 2003 मध्ये, पृथ्वी आणि मंगळ ग्रह त्यांच्या कक्षेत होते, तेव्हा मंगळ पृथ्वीपासून सर्वात जवळ होता. तो पृथ्वीपासून केवळ 35 दशलक्ष मैल होता, या तुलनेने जवळचे अंतर पाहता, यावेळी मंगळ हा शुक्रापेक्षा पृथ्वीच्या जवळ होता.


बुध पृथ्वीपासून केवळ 35 दशलक्ष मैल दूर होता


दरम्यान आता संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार बुध हा सर्वात जवळचा ग्रह असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2,000 वर्षांपूर्वी, बुध पृथ्वीपासून केवळ 35 दशलक्ष मैल दूर होता. अशा घटना अत्यंत दुर्मिळ आहेत आणि हजारो वर्षांच्या अंतराने घडू शकतात.