नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरेबियन बेटावरुन फरार झाला होता. त्याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याचा अटक झाल्यानंतरचा पहिला फोटो हाती लागला आहे. चोक्सीचा हा फोटो डोमिनिकातील तुरुंगातील असल्याचं समोर आलं आहे. हा फोटो एएनआयनं आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. या फोटोत चोक्सीचा एक डोळा खूप लाल दिसून येत आहे. 



डोमिनिका सरकार मेहुल चोकसीला भारताच्या ताब्यात देण्याऐवजी पुन्हा अँटिगा-बार्बुडा येथे पाठवणार आहे. अँटिगा-बार्बुलाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊनी यांनी एबीपी न्यूजला सांगितले होते की, हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे.दरम्यान डोमिनिका येथील मेहुल चौक्सीचे वकील मार्श वेन यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, आज सकाळी पोलिस स्टेशनमध्ये मेहुलची भेट झाली. वकिलाच्या म्हणण्यानुसार, अपहरण करुन डोमेनिका येथे आणण्यात आले असा आरोप मेहुलने केला आहे. तसेच आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला आहे. मेहुल चौकसीला दिलासा मिळावा यासाठी त्याचे वकील न्यायालयात अपील दाखल करणार आहेत.


काही दिवसांपूर्वीच मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा येथून फरार झाला होता. त्यानंतर इंटरपोलने त्याच्या विरोधात ‘यलो नोटीस’ जारी केली  होती. या नोटीसनंतर डोमिनिकामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. बुधवारी मेहुलच्या अटकेच्या बातमीनंतर अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊनी म्हणाले की, मेहुल चोकसीला अँटिगाकडे न सोपवण्यास सांगितले आहे. मेहुलला भारतात पाठवण्याची गरज आहे. त्यामुळे त्याला भारताकडे देण्यास डोमिनिका सरकारला सांगितले आहे.


2018 साली जागतिक पोलीस संस्था इंटरपोलने जारी केलेल्या चोकसीविरोधात रेड नोटिसमुळे  जगातील कोठेही इमिग्रेशन पॉईंटमध्ये चोकसीने प्रवेश केल्यास त्यांना सतर्क केले जाईल. तसेच भारतीय एजेन्सींना संशय आहे की चोकसी क्युबा इथे आहे. कारण अँटिगाप्रमाणेच क्युबाचाही भारताशी प्रत्यर्पण करार नाही. मेहुल चोकसी हा भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढत आहे. त्याच्याकडे सध्या अँटिग्वानचे नागरिकत्व आहे. गेल्यावर्षी अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन म्हणाले होते की चोकसीचे सर्व कायदेशीर पर्याय संपले की त्याचं नागरिकत्व रद्द केले जाईल.


चोक्सीने याआधी असे म्हटलं होतं की, त्याच्यावरील आरोप खोटे, निराधार आणि राजकीय प्रयत्नांमुळे प्रेरित आहेत. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोकसी याचा पुतण्या नीरव मोदी याला अटक केली आहे. काका प्रमाणेच मोदीने ही 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता आणि सध्या तो युनायटेड किंगडममध्ये आहे. नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचे प्रकरण ब्रिटिश सरकारने गेल्या महिन्यात मंजूर केले होते. तथापि मोदी अद्यापही या प्रत्यार्पणाच्या आदेशास यूके उच्च न्यायालयासमोर आव्हान देऊ शकतो. फेब्रुवारी 2019 मध्ये स्वाक्षरी केलेल्या आपल्या प्रत्यार्पणाच्या आदेशाविरोधात कोर्टात गेलेल्या विजय मल्ल्याच्या बाबतीतही या प्रक्रियेस काही महिने किंवा काही वर्षे लागू शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :