Israel-Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधील संघर्षादरम्यान अमेरिकन फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्ड (McDonalds) वर बंदीची मागणी करण्यात येत आहे. मॅकडोनाल्ड्स (Mcd) च्या एका निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मॅकडोनाल्ड्सने इस्त्रायली सैनिकांना (IDF-Israel Defense Forces) मोफत जेवण देण्याची घोषणा (McDonald's Boycott) केल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. मेकडोनाल्ड इस्रायलने इस्त्रायली सैनिक आणि फ्रंट लाईन वर्कसना दररोज सुमारे 4,000 जणांना मोफत अन्नदान करण्याची घोषणा केली. यासाठी मेकडोनाल्ड इस्रायलने 5 शाखा उघडत असल्याची घोषणा केली. त्यामुळे मेकडोनाल्डला वर बंदीची मागणी केली जात आहे.


इस्रायल-हमास युद्धामुळे मॅकडोनाल्डवर बंदीची मागणी


अमेरिकन फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्डने इस्रायली सैनिकांसाठी मदतीची घोषणा केल्यानंतर पॅलेस्टिनी समर्थक अरब देशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. इस्रायली मॅकडोनाल्डच्या निर्णयानंतर लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. मॅकडोनाल्डने इस्रायली सैनिकांना अन्न पुरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अरब देशांकडून मॅकडोनाल्डवर बंदीची मागणी करण्यात येत आहे. अरब देशांमध्ये बॉयकॉट मॅकडोनाल्ड (Boycott McDonald's) ट्रेंडमध्ये दिसत आहे. बंदीच्या मागणीनंतर आता मॅकडोनाल्डने पुढे सरसावत यावर प्रतिक्रिया दिली आहे.


मॅकडोनाल्डवर बंदीच्या मागणीचं नेमकं कारण काय?


मॅकडोनाल्ड (American Fast Food Chain Company McDonalds) कंपनीला इस्रायली सैनिकांना मोफत अन्न पुरवण्याबाबत अरब देशांना स्पष्टीकरण द्यावं लागत आहे. आता मॅकडोनाल्ड कंपनीच्या प्रतिनिधींना अरब देशांना या निर्णयामागचं कारण समजावण्याची वेळ आली आहे. मॅकडोनाल्ड कंपनीने जॉर्डन, तुर्की आणि सौदी अरेबिया या देशांना या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय, मॅकडोनाल्ड्सने गाझा पट्टीतही मदत कार्यांसाठी आर्थिक निधी देणार असल्याचं म्हटलं आहे.


इस्रायली मॅकडोनाल्डकडून इस्रायली लष्कराला मोफत जेवण


मॅकडोनाल्डच्या (McDonald's Controversy) सौदी अरेबिया (Saudi Arabia) च्या फ्रँचायझीने इस्रायली मॅकडोनाल्डच्या फ्रँचायझीच्या निर्णयापासून स्वतंत्र असल्याचं सांगत हात वर केले आहेत. मॅकडोनाल्ड सौदी अरेबिया (McDonald's Saudi Arabia) ने सांगितलं की, 'इस्रायली सैनिकांना मोफत जेवण देण्याचा निर्णय हा मॅकडोनाल्डच्या इस्रायली फ्रँचायझीचा वैयक्तिक निर्णय होता. मॅकडोनाल्ड्स इंटरनॅशनल किंवा इतर कोणत्याही देशातील कोणत्याही एजंटची यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भूमिका आणि संबंध नाही. तो निर्णय फक्त इस्रायल फ्रेंचायझीचा आहे.'


महत्वाच्या इतर बातम्या :


Israel Hamas War : मृत्यूचं तांडव! इस्रायल-हमास युद्धात 4500 हून अधिक मृत्यू, जखमींचा आकडा 12000 पार; 197 भारतीयांची तिसरी तुकडी मायदेशी परतली