Rohit Sharma Record : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने उत्कृष्ट खेळी केली. सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं 83 धावांची दमदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या दमदार खेळीसह रोहित शर्माने विश्वचषकात धावांच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकलं आहे. 


विश्वचषकात 'किंग' कोहलीवर 'हिटमॅन' भारी


विश्वचषकात चौकार आणि षटकार मारण्यापासून धावा आणि शतकांच्या बाबतीतही रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा सर्वच बाबतीत वरचढ आहे. महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली रोहित शर्मापेक्षा एक विश्वचषक जास्त खेळला आहे. तुलनेनं एक विश्वचषक कमी खेळूनही प्रत्येक बाबतीत रोहितने कोहलीला पछाडलं आहे.


वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा विराट कोहलीच्या पुढे


विराट कोहली चौथा विश्वचषक खेळत आहे. कोहलीने 2011 मध्ये वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं. तर, रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे. रोहितने 2015 मध्ये पहिला विश्वचषक सामना खेळला. विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 29 सामने खेळले आहेत, तर रोहितने आतापर्यंत विश्वचषकात फक्त 20 सामने खेळले आहेत. विश्वचषकात विराट विरुद्ध रोहितची आकडेवारीच तुम्हाला त्याची कामगिरी सांगेल.


धावा


रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये 1195 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीच्या खात्यात 1186 धावा जमा आहेत. विश्वचषक 2023 च्या भारत-पाकिस्तान सामन्यात रोहितने धावांच्या बाबतीत विराटला मागे टाकले आहे.


सर्वाधिक चौकार


रोहित शर्माच्या नावावर विश्वचषकात 122 चौकार आहेत, तर विराट कोहली याबाबती थोडासा पिछाडीवर आहे. कोहलीने विश्वचषकात 106 चौकार मारले आहेत.


सर्वाधिक षटकार


वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने एकूण 34 षटकार ठोकले आहेत. विराट कोहली या बाबतीत खूपच मागे असून त्याच्या नावावर फक्त 5 षटकार आहेत.


फलंदाजीची सरासरी


रोहित शर्माने विश्वचषकात 66.38 च्या फलंदाजीच्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या तुलनेनं विराट कोहलीची विश्वचषकातील फलंदाजीची सरासरी 49.41 आहे.


स्ट्राइक रेट


विश्वचषकात रोहित शर्मा स्फोटक फलंदाजी करतो, त्याचा स्ट्राइक रेट 101.96 आहे. तर, वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचा स्ट्राईक रेट 86.06 आहे.


शतक


रोहित शर्मा हा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे. रोहित शर्माने आतापर्यंत विश्वचषकात 7 शतके झळकावली आहेत. विराट कोहलीला विश्वचषकात आतापर्यंत फक्त दोन वेळा शतकी खेळी करता आली आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


IND vs PAK : 'किंग' कोहलीकडून बाबर आझमला जर्सी भेट, मैदानावरचा खास क्षण; वसीम अक्रम मात्र भडकला