Maldives Fire : मालदीवची (Maldives) राजधानी माले (Male) मध्ये गुरुवारी (10 नोव्हेंबर) रोजी विदेशी कामगारांच्या घरांमध्ये भीषण आग (Fire News) लागली. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू (Death in Maldives Fire) झाला आहे. त्यापैकी 9 जण भारतीय (Indian) असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या आगीत अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. दरम्यान, ही आग तब्बल चार तास धुमसत होती. तब्बल चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. 


अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांना चार तास लागले. मृतांमध्ये नऊ भारतीय आणि एका बांगलादेशी नागरिकांचा (Bangladeshi Citizen) समावेश आहे. आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली. याच इमारतीच्या वरच्या मजल्यावरून त्यांनी 10 मृतदेह बाहेर काढले. इमारतीच्या तळमजल्यावरील कार रिपेअरिंग गॅरेजमध्ये आग लागल्याचं सांगण्यात येत आहे." 


भारतीय उच्चायुक्तांकडून शोक व्यक्त


मालदीवमध्ये, भारतीय उच्चायुक्तालयानं (Indian High Commission) माले येथील आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ज्यामध्ये 9 भारतीय नागरिकांसह एकूण 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत ते मालदीव सरकारच्या संपर्कात असल्याचं भारतीय दूतावासानं (Indian Embassy) सांगितलं आहे. 


मालदीवमध्ये परदेशी कामगारांची दयनीय अवस्था 


मालदीव सरकारच्या एका उच्च अधिकाऱ्यानं सांगितलं की, अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. तसेच जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मालदीवच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं ट्वीट केलं की, माले येथील आगीत बळी पडलेल्यांसाठी स्टेडियममध्ये मदत आणि बचाव केंद्र उभारण्यात आलं आहे.


माले येथील या वेदनादायक घटनेमुळे येथे काम करणाऱ्या परदेशी कामगारांच्या वाईट परिस्थितीची बाब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालदीवच्या राजकीय पक्षांनी येथे काम करणाऱ्या परदेशी कामगारांच्या परिस्थितीवर टीका केली आहे. 250,000 पुरुषांच्या लोकसंख्येपैकी परदेशी कामगारांची संख्या जवळपास निम्मी आहे. बहुतेक बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका येथील आहेत, अशी माहिती मिळत आहे. कोरोनाच्या काळात मालदीवमधील परदेशी कामगारांच्या दयनीय स्थितीचे प्रकरण पहिल्यांदा समोर आलं आहे. तसेच, मालदीवच्या स्थानिक लोकांपेक्षा परदेशी कामगारांमध्ये कोरोनाचा संसर्ग तिप्पट वेगानं पसरला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


King Charles : किंग्स चार्ल्स यांच्यावर आंदोलकाने फेकली अंडी, निषेध करत म्हणाला...