King Charles Pelted with Eggs : ब्रिटनचे ( Britain ) किंग चार्ल्स ( King Charles ) यांच्यावर इंग्लंडमधील ( England ) यॉर्क ( York City ) शहरामध्ये एका व्यक्तीने अंडी फेकली. ब्रिटनचे महाराजा तिसरे चार्ल्स आणि राणी कॅमिला हे बुधवारी यॉर्क शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका व्यक्तीने किंग आणि क्वीन यांचा निषेध करत त्यांच्यावर अंडी फेकली आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यॉर्कमध्ये आल्यावर एका आंदोलकाने त्यांच्यावर अंडी फेकण्यास सुरुवात केली, यातून ते थोडक्यात बचावले. किंग चार्ल्स यांनी या घटनेकडे दुर्लक्ष करत लोकांना अभिवादन करणं सुरु ठेवलं. यावेळी त्यांच्या अंडी दिशेने फेकली जात होती, त्यातील एक अंड त्यांच्या पायाजवळ पडलं. यानंतर किंग चार्ल्स पुढे निघून गेले.


'या' व्यक्तीने फेकली अंडी


ब्रिटीश मीडिया रिपोर्टनुसार, किंग चार्ल्स यांचा विरोध करणारी आणि अंडी फेकणारी ही व्यक्ती ग्रीन पार्टीचा नेता ( Green Party leader ) पॅट्रिक थेलवेल ( Patrick Thelwell ) हा होता. त्याने किंग चार्ल्स यांच्यावर अंडी फेकत त्यांचा निषेध केला.  'हा देश गुलामांच्या रक्तातून तयार झाला आहे' असं थेलवेल यांनं म्हटलं. थेलवेल हा डाव्या विचारसरणीच्या राजकारणासाठी ओळखला जातो. त्याचं वय  23 वर्ष आहे. अनेक पर्यावरणवादी चळवळी आणि आंदोलनांसाठी त्याला याआधी पाच वेळा अटक करण्यात आली आहे. 






किंग्स चार्ल्स यांच्यावर अंडी फेकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किंग चार्ल्स यांच्यावर एकूण चार अंडी फेकल्याचे दिसत आहे. नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांनी सांगितलं आहे की, 23 वर्षीय आंदोलक पॅट्रिक थेलवेल याला 'सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.






आंदोलक पॅट्रिक थेलवेल यांना अटक


यॉर्क शहरात मिकलेगेट बारमध्ये ही घटना घडली. थेलवेल याने किंग चार्ल्स यांच्यावर अंडी फेकली आणि त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी जमावाने त्याच्याविरोधात आवाज उठवला. त्यानंतर या आंदोलक थेलवेल याला पोलिसांनी अटक केली. आंदोलकाला अटक केल्यानंतर किंग चार्ल्सची यांचा कार्यक्रम सुरु सुरळीत पार पडला. किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांच्या हस्ते यॉर्क मिन्स्टर कॅथेड्रल येथे दिवंगत महाराणी एलिझाबेथ II यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.



कोण पॅट्रिक थेलवेल आहे ? ( Who is Patrick Thelwell )


पॅट्रिक थेलवेल ( Patrick Thelwell ) ग्रीन पार्टीचे नेते आणि पर्यावरणवादी आहे. यॉर्क शहरामधील हल रोड प्रभागासाठी 2019 च्या स्थानिक निवडणुकीत थेलवेल ग्रीन पार्टीचे उमेदवार म्हणून उभे होते. महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यू झाल्यानंतर नव्या खोट्या राजापुढे नतमस्तक होणार नाही, असे थेलवेल यांनी यापूर्वी एका ट्विटमध्ये म्हटले होतं.