Lebanon Blast:इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणाऱ्या पेजरचे स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर बुधवारीही या स्फोटांची मालिका सुरु असून आता यात 20 ठार झाल्याची बातमी आहे. 3000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. लेबनॉनमधील चक्रावून टाकणाऱ्या या स्फोटानंतर 60 घरे 15 कर आणि डझनभर दुचाक्यांना आग लागली असून अग्निश्मन दलाला पाचारण करण्यात आले आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणाऱ्या वॉकी टॉकीमध्ये देशातील दक्षिण भागात आणि राजधानीच्या दक्षिणेतील उपनगरांमध्ये स्फोट झाले आहेत. रिपोर्टनुसार काल एक स्फोट झाला होता. त्या घटनेतील मृतांवर जिथं अंत्यसंस्कार करण्यात येणार होते त्या जागेजवळ वॉकी टॉकीचा स्फोट झाल्याची माहिती आहे. मंगळवारी झालेल्या पेजर स्फोटात 3 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती होती.
या हल्ल्याच्या मागे कोणाचा हात?
लेबनॉनमधील निमलष्करी संघटना हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या खिशामध्ये असलेल्या पेजरचा स्फोट झाल्याने हजारो लोक जखमी झाले आहेत. लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये ही घटना घडली. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हे पेजर्स हिजबुल्लाहततर्फे वापरण्यात येतात. देशभरात एकाच वेळी झालेल्या या हल्ल्यात ३००० हूनअधिक लोक जखमी झाले आहेत. २० जण ठार झाल्याची माहिती आहे. हिजबुल्लाह या संघटनेने या हल्ल्याला इज्राईल जबाबदार असल्याचं म्हटलंय. हा हल्ला हिजबुल्लाच्या नेत्यांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. इस्राईलच्या गुप्तचर संस्था मोसादने लेबनॉनमधील अतिरेकी गटाने आयात केलेल्या पेजरमध्ये स्फोटके पेरली होती असं सांगण्यात येतंय.
इस्राईलचे संरक्षणमंत्री म्हणाले..
लेबनॉनमधील वॉकी टॉकी स्फोटानंतर २० ठार झाल्याचे सांगण्यात आल्यानंतर इस्राईलचे संरक्षण मंत्री गॅलंट यांनी बुधवारी युद्धाच्या नव्या टप्प्यात प्रवेश केल्याचं सांगितलं. तर हिजबुल्लाहच्या नेत्यांनी इस्राईलच्या गुप्तचर संस्थेवर हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार इस्राईलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले, धैर्य, दृढनिश्चय आणि चिकाटी आवश्यक असून आम्ही युध्दाचा एक नवीन टप्पा उघडत आहोत. असं म्हटलंय. लेबनीज अंतर्गत सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, स्फोटांची दुसरी लाट येण्याच्या एक दिवस आधी देशभरात अनेक वायरलेस कम्युनिकेशन उपकरणांचा स्फोट झाला. हे स्फोट विशेषत: हिजबुल्लाहचा गड - बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरात झाले.
दक्षिण लेबनॉनमध्ये तणाव
हिजबुल्लाहनं बुधवारी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्त्रायलच्या सैन्य दलाच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ला केला. पेजर हल्ल्यानंतर लेबनॉनचा हा पहिला हल्ला होता. पेजर स्फोटानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिजबुल्लाह आणि इस्त्रायल यांच्यातील वादानं या ठिकाणी पहिल्यापासून तणाव निर्माण झालेला आहे. हिजबुल्लाह हा लेबनॉन मधील मोठा दहशतवादी गट आहे, जवळपास 1 लाख सैन्य असल्याचा त्यांचा दावा आहे. हिजबुल्लाला उद्देश इस्त्रायलचा नाश करायचा असा आहे.हिजबुल्लाला उघड इराणची मदत असते, कदाचित इस्त्रायलं त्यांना तुम्ही जे करता त्यापेक्षा अधिक चांगलं आम्ही करु शकतो यासाठी ही चुणूक दाखवली असावी, असं म्हटलं जात आहे.