प्यॉंगयांग: उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष  मून जे इन यांची ऐतिहासिक भेट झाली. संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं होतं.


कोरियातील युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशाचे नेते एकत्र आले. ही भेट दोन्ही देशाच्या सीमेवरील डिमिलिट्रायज जोन अर्थात डीएमझेडवर झाली.

डीएमझेडमध्ये बनलेल्या पनमूनजेओम गावाजवळ ‘पीस हाऊस’ इथं दोन्ही देशाचे प्रमुख एकमेकांना भेटले.

1953 मध्ये कोरिया युद्धानंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या नेत्याने दक्षिण कोरियाच्या जमिनीवर पाय ठेवला.

पनमुनजोममध्ये सीमारेषा पार केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी काहीवेळासाठी उत्तर कोरियाच्या सीमेत पाय ठेवला. त्यानंतर दोघेही दक्षिण कोरियामध्ये असलेल्या पीस हाऊसकडे रवाना झाले.

 नव्या इतिहासाची सुरुवात

या बैठकीनंतर व्हिजिटर्स डायरीत किम जोंगने ही बैठक ऐतिहासिक झाल्याचं नमूद केलं. नव्या इतिहासाची सुरुवात आहे. आम्ही शांती प्रस्थापित करणारा नवा आध्याय सुरु करत आहोत, असं किम जोंगने डायरीत लिहिलं.

 इंटर कोरियन समिट

दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या कार्यक्रमाला ‘इंटर कोरियन समिट’ असं नाव देमयात आलं. जगाकडे कानाडोळा करुन, सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या करणारा किम जोंग, पहिल्यांदाच शांततेसाठी पावलं टाकत आहे.

आजपर्यंत त्याची ओळख सनकी हुकूमशाहा म्हणूनच आहे. मात्र आता तो ती ओळख हळूहळू पुसण्याचा प्रयत्न करत आहे. 

शांतीसाठी प्रयत्न

जगभरात निर्माण झालेली आपली प्रतिमा पुसण्यासाठी किम जोंग प्रयत्न करत आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी तो अन्य देशांना साथ देत आहे.

डीएमझेड काय आहे?

डीएमझेडमध्ये दोन्ही देशांमध्ये सीमारेषा आहे. याचा उत्तर भाग उत्तर कोरियाकडे, तर दक्षिण भाग दक्षिण कोरियाकडे आहे.

कोरिया युद्धानंतर संयुक्त राष्ट्रच्या देखरेखीत उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये एक मोकळी जागा ठेवण्यात आली. यालाच डिमिलेट्रायज झोन म्हटलं जातं.

250 किमी लांब आणि चार किमी रुंद असलेल्या या क्षेत्रात दोन्ही देश कोणतंही सैन्य तैनात करु शकत नाही. इतकंच नाही तर इथे कोणतीही मानवी वस्ती, गाव वसवू शकत नाही. हे संपूर्ण क्षेत्र संयुक्त राष्ट्राच्या अखत्यारित आहे.

इथे विनाशस्त्र काही सैनिक आहेत. मात्र 250 किमीनंतर बॉर्डरच्या दुतर्फा 10 लाख सैन्य नेहमीच तैनात असतात.

संबंधित बातम्या