Ukraine-Russia Conflicts : युक्रेन (ukraine) आणि रशियामधील (Russia) तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. पुन्हा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियासोबत युक्रेनच्या सीमेवर आणखी दीड लाख सैनिक तैनात करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या सगळ्यामध्ये भारतातील जनतेच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न आहे की, या दोन देशांमध्ये युद्ध झाले तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल. जाणून घ्या सविस्तर


1. दूरगामी परिणाम
प्रथम त्याच्या दूरगामी परिणामांबद्दल बोलायचं झालं तर... भारत देश कोणासोबत आहे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध झाले तर त्याची भूमिका घ्यावी लागेल. भारताने रशियाला पाठिंबा दिल्यास अमेरिका नाराज होऊ शकते. कारण अमेरिका हे युद्ध थांबवण्यासाठी रशियावर सतत दबाव आणत आहे. अमेरिकेमुळे भारत युक्रेनच्या बाजूने गेला तर रशियासोबतचे संबंध बिघडतील, जे चीनच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही.


2. शेअर बाजारावर परिणाम
युद्धाच्या शक्यतेमुळे गेल्या काही दिवसांपासून जगभरातील शेअर बाजारांची अवस्था वाईट झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे. जर युद्ध झाले तर बाजार मोठ्या प्रमाणात पडू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊ शकते.


3. कच्च्या तेलाच्या किमती वाढणार


जर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झाले तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 100 ते $ 120 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. याशिवाय नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दरही गगनाला भिडू शकतात.


5. पाकिस्तानला संधी मिळेल


युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात कोणत्याही कारणामुळे भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर परिणाम झाला, तर त्याचा फायदा पाकिस्तानला मिळू शकतो, जो भारतासाठी हानिकारक असेल. खरे तर चीन आधीच पाकिस्तानसोबत आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तान रशियाशी द्विपक्षीय संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. रशिया पाकिस्तानच्या जवळ गेला तर भारतासाठी ते चांगले होणार नाही. भारताचा रशियासोबतचा व्यापारही अब्जावधींचा आहे.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha