Russia Ukraine Conflict  : रशिया आणि युक्रेन दरम्यानचा तणाव वाढला असून युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहेत. युक्रेनच्या दोन प्रांतांना रशियाने स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. आता रशिया या भागांमध्ये सैन्य पाठवण्याची तयारी करत आहे. फारसा चर्चेत नसणार युक्रेन सध्या रशियासोबतच्या वादामुळे चर्चेत आला आहे. जाणून घ्या या देशाबाबत..


युक्रेनची लोकसंख्या 


युक्रेन हा जगातील 46 वा आणि युरोपमधील दुसरा मोठा देश आहे. युक्रेनचे एकूण क्षेत्रफळ जवळपास सहा लाख चौकिमी आहे. या देशाची लोकसंख्या 4.49 कोटींच्या आसपास आहे. युक्रेनच्या लोकसंख्येतील 78 टक्के जण हे मूळ युक्रेनवासिय आहेत. तर, उर्वरित 22 टक्के लोकसंख्या ही इतर देशातून युक्रेनमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांची आहे. युक्रेनमध्ये 100 महिलांमागे 86.3 पुरुष एवढे प्रमाण आहे. 


युक्रेनचे चलन, भाषा


युक्रेनमधील सर्वात मोठे शहर कीव असून हे शहर देशाची राजधानी आहे. कीवमध्येच 2.8 दशलक्ष नागरीक वास्तव्य करतात. युक्रेनियन भाषा ही अधिकृत भाषा आहे. या देशात इतरही भाषा बोलल्या जातात.  Ukrainian Hryvnia हे अधिकृत चलन आहे. 


भारतापासूनचे अंतर


नवी दिल्ली पासून युक्रेनचे अंतर जवळपास 5000 किमी आहे. विमानातून प्रवास केल्यास युक्रेन गाठण्यास पाच तास लागतात. 


युक्रेन कधी स्वतंत्र झाला?


24 ऑगस्ट 1991 रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन स्वतंत्र झाला होता. युक्रेन 1922 मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये सहभागी झाला होता. रशिया, बेलारूस, पोलंड आणि स्लोवाकिया आदी देशांना लागून युक्रेनची सीमा आहे. 


जगात प्रसिद्ध आहे युक्रेन 


युक्रेनचा साक्षरता दर 99.8 टक्के आहे. सर्वाधिक साक्षर देशांच्या यादीत युक्रेन चौथ्या स्थानी आहे. तर, सरासरी आयुर्मान 71 वर्ष आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मद्याची सर्वाधिक विक्री होणाऱ्या देशांच्या यादीत युक्रेन सहाव्या क्रमांकावर आहे. फुटबॉल आणि बॉक्सिंग या देशातील लोकप्रिय खेळ आहे. अण्वस्त्रसाठा सोडणारा हा पहिलाच देश आहे. 
 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha